पत्रकार मिरगणे यांना मारहाण करणाऱ्या एपीआय नाईक यांना निलंबित करण्याची मागणी
अमरावती (Maharashtra Journalists) : पत्रकार विकास मिरगणे यांना मारहाण करणारे एपीआय शांताराम नाईक यांना निलंबित करण्यात यावे ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे (Maharashtra Journalists) विदर्भा अध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात सोमवार(ता. आठ) रोजी जिल्हाकचेरीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने देण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आले.
यावेळी नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, ए पी एस शांताराम नाईक यांच्या दादागिरी चा निषेध असो, पत्रकार मिरगणे यांना न्याय मिळालाच पाहिजे, एपीआय शांताराम नाईक निलंबित झालेच पाहिजे, पत्रकार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
एका वृत्तवाहिनीचे पत्रकार विकास मिरगणे यांना गिरगाव चौपाटी येथे शनिवारी एपीआय शांताराम नाईक यांनी केलेल्या मारहाणीचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटने कडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. विकास मिरगणे हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये वाहनाजवळ थांबले असता त्यांचा चालक थोड्या वेळासाठी गाडीपासून दूर गेला होता याच दरम्यान साहेब पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी वाद घातला त्यांना संयम ठेवण्याची विनंती केली असता ही त्यांनी संतापाच्या भरात पत्रकार मिरगणे यांच्या कानशिलात लगावली शिल्लक पार्किंगच्या कारणावरून वार्तांकन करत असलेल्या पत्रकाराला दमदाटी करून मारणे हे अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निवेदनात नमूद केले आहे.
पत्रकार आपले कर्तव्य पार पाडत असताना एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडून असे गैरवर्तन होणे चुकीचे असून या संबंधित एपीआय शांताराम नाईक यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी (Maharashtra Journalists) पत्रकार संरक्षण कायद्याचे अंमलबजावणी करण्यात यावी, पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे या मागण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
आंदोलनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार शहराध्यक्ष विक्रम ढोके शहर सचिव संजय तायडे डिजिटल आघाडी जिल्हा सचिव मनीष गुडदे विजय गायकवाड ज्येष्ठ पत्रकार अशोक भाई जोशी, नितीन राऊत, सुरेंद्र आकोडे, सुरज दहाट, संजय शेंडे, नितीन मुळे, राजेश्वर घोरमाळे, धनराज खर्चान, पुंडलिक देशमुख, गजानन खोपे, सोमेश्वर जेवढे, सहजाद अब्दुल नकुल नाईक, विनोद इंगळे, सईद खान, गजानन मेश्राम, गजानन जीरापुरे पी एन देशमुख, मोहम्मद सादिक, राजाभाऊ वानखडे, मोहोड यांच्यासह बहुसंख्येने (Maharashtra Journalists) पत्रकार आंदोलनात सहभागी झाले होते.