श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन!
नांदेड (Deputy CM Ajit Pawar) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बुधवारी दुपारी श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदींनी त्यांचे स्वागत केले.




