जिल्हाध्यक्षाच्या नावाबाबत निरीक्षकांनी जाणून घेतली मते
वर्धा (BJP District President) : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीकडे सध्या राजकीय धुरिणांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्षपदाच्या अनुषंगाने निरीक्षकांनी मते जाणून घेतलीत. सध्या (BJP District President) भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पदाबाबत नऊ नावांची चर्चा असल्याची माहिती आहे. निरीक्षकांनी मते जाणून घेतली असली तरीही नाव जाहीर होण्यास अवकाश असल्याचे उत्सूकता कायम आहे.
भाजपच्या जिल्हा कार्यालयात पालकमंत्री, आमदार, माजी खासदार, पदाधिकार्यांची उपस्थिती
भाजपच्या जिल्हा कार्यालयात BJP District President) रविवारी २७ एप्रिल रोजी भाजप अध्यक्षाच्या निवडीच्या अनुषंगाने मते जाणून घेण्याची प्रक्रिया पार पडली. जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या या प्रक्रियेच्या वेळी पालकमंत्री, आमदार, माजी खासदार, संबंधित पदाधिकार्यांची उपस्थिती होती. निरीक्षक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष सुनील भेंडे यांनी संबंधितांची मते जाणून घेतली. यावेळी संबंधितांनी निरीक्षकांपुढे जिल्हाध्यक्ष नावाबाबत आपली मते सादर केलीत. यावेळी भाजपचे आमदार, माजी खासदार, पदाधिकार्यांनी निरीक्षकांपुढे मत सादर केले. पालकमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, राजेश बकाणे, सुमीत वानखेडे, दादाराव केचे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
अध्यक्षाच्या नावाबाबत मते जाणून घेतल्यानंतर याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर सादर करण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत (BJP District President) जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. वर्ध्यात नावांबाबत मते जाणून घेण्याची प्रक्रिया पार पडल्याने उत्सूकता वाढू लागलेली आहे. तीन प्रवर्गांत नावांवर मते जाणून घेण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हाध्यक्ष पदाकरिता सुनील गफाट, संजय गाते, प्रशांत बुरले, मिलींद भेंडे, अतुल तराळे, अशोक विजेकर, शंकर आत्राम, अर्चना वानखेडे, सरिता गाखरे या नावांची चर्चा आहे.