जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात आंदोलन
अमरावती () : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर प्रलंबित मागण्यांबाबत शासन उदासीन असल्याने शेतकऱ्यांना ठेंगा दाखविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या करिता काँग्रेस रस्त्यावर उतरली असून मंगळवारी इर्विन चौक येथे शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना (District Congress Protest) मागणीचे निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे व माजी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्व सदरचे आंदोलन करण्यात आले,
शेतकऱ्यांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील महायुती शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे अनेक आश्वासने दिलेली आहेत. मात्र त्यांच्या पुर्ततेसाठी राज्य शासनाकडून कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत. तसेच शेतकऱ्यांचे इतर अनेक प्रश्न असून त्याकडे राज्यशासन सतत दुर्लक्ष करीत आहे. या कारणास्तव शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. राज्य शासनाचे , अधिवेशन सुरू होत आहे.
या (District Congress Protest) अधिवेशनामध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. उत्पादन खर्चानुसार शेत-मालाला भाव द्यावा, आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, त्यामुळे त्वरित कर्जमाफी करावी. महाविकास आघाडीने आघाडीच्या कर्जमाफीतील अद्यापही जिल्ह्यात शेकडो शेतकरी वंचित आहे त्यांची कर्जमाफी करावी. नियमित कर्जफेड करणारे शेकडो शेतकरी अद्यापही प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यात जमा करावे. मेळघाटातील रोजगार हमी योजनेच्या मजुरांना रखडलेले वेतन त्वरित मिळावे 4 दिवसाच्या आत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल.
2024 -2025 सोयाबीन पिकाच्या अतिवृष्टी ची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. सोयाबीन ,तूर ,कापूस ,चना या उत्पादनाला भाव नसल्याने भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा रक्कम द्यावी. शेतकऱ्यांना कृषीपंपाकरिता रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा आधी मागण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वामुळे इर्विन चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करीत निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करीत (District Congress Protest) सदर मागण्या शासनापर्यंत पोहोचवीण्याची मागणी केलेली आहे. अन्यथा शेतकऱ्यांकरिता आगामी काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील, यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला.
आंदोलनात हरीभाऊ मोहोड, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, दिलीप काळबांडे,रामेश्वर अभ्यंकर, कांचनमालाताई गावंडे, प्रविण मनोहर,मुक्कदर पठाण, दयारामजी काळे,गिरीशभाऊ कराळे,महेंद्र गैलवार,हरीश मोरे,श्रीकांत गावंडे,संजय वानखडे,जयंत देशमुख,अनंत साबळे,मोहन सिंघवी, सुनील गावंडे, बिट्टू मंगरुळे, नितीन गोंडाने, मुकुंद देशमुख, सेतू देशमुख, संजय बेलोकार, सहदेव बेलकर, विनोद पवार, अमोल घुरडे, सुधाकर खारोडे, अजय डिके, श्रीधर काळे, कैलास आवारे, अमोल बोरेकार,शैलेश नाथे, नितीन खलोकर, राजाभाऊ टवलारकर,नामदेव तनपुरे,अमित गावंडे,श्रीकांत झोडपे, राजाभाऊ हाडोळे,सुधीर पाटेकर, आतिश शिरभाते,भूषण कोकाटे, अभिजीत मानकर,नितेश वानखडे, सागर देशमुख,ईश्वर बुंदिले, प्रदीप देशमुख, हेमंत येवले, कलीम भाई, जहीर भाई, विदर्भ कुमार बोबडे, प्रमोद दाळू, शशांक धर्माळे, राजेंद्र उल्ले, शिवाजी काळे, किशोर देशमुख, डॉ.काशीकर, सिद्धार्थ बोबडे, सचिन धर्माळे, हरेराम मालवीय, मुखत्यार भाई,श्रीकांत होले, अमोल होले, पंकज वानखडे, निशांत जाधव, अमोल धवसे, अक्षय पारस्कर, नितीन देशमुख, राजेश काळे, रमेश काळे, राजू देशमुख, राजेश जाधव, बाबुभाई इनामदार, गजानन महल्ले, उत्कर्ष देशमुख, अभिषेक बोंडे, प्रशांत गोरले, अरुण डिके, श्रीकांत पोटदुखे, यांची उपस्थिती होती.
निवडणुकीपूर्वी केवळ शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल करण्याचे काम शासनाने केलेले आहे. (District Congress Protest) शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आम्ही रस्त्यावर उतरू. शासनाने याची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करू.
-बबलू देशमुख ,जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी (ग्रामीण)
हे सरकार सर्वच घटकांची फसवणुक करणारे सरकार आहे .निवडणुक आली की, मोठी आश्वासने द्यायची. परंतु त्यांची पुर्तता मात्र करीत नाही. परिणामता आज शेतमालाला भाव नाही, कर्जमाफी नाही. निराधार योजनांचे देखील पैसे मिळाले नाही. इतकेच नव्हे तर मेळघाटातील मजुर हे त्यांच्या हक्काच्या मजुरीपासून वंचित आहेत.
-यशोमती ठाकुर, माजीमंत्री
राज्य सरकारने कोणत्याच आश्वासने पाळली नाही. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांच्या हिताकरिता रस्त्यावर उतरून (District Congress Protest) आंदोलन करावे लागत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शासनाप्रती रोष व्यक्त होत आहे.
-खा. बळवंत वानखडे