शहरातील मुस्लीम लायब्ररी चौकात दोघांची हत्या!
भंडारा (Double Murder) : रक्षाबंधनाच्या दिवशी दुहेरी हत्याकांडाने भंडारा शहर हादरले. शहरातील गजबजलेल्या मुस्लीम लायब्ररी चौकात दोघांची हत्या करण्यात आली. मुस्लीम लायब्ररी चौकात उभ्या असलेल्या टिंकू (बसीम) खान व शशांक गजभिये याचा जागीच मृत्यू झाला. तर टिंकू खान याला रूग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. सदर हत्या दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री 9.45 वाजता दरम्यान झाली. जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या हत्याप्रकरणातील चौघांना ताब्यात घेतले आहे.
जुन्या वैमनस्यातून घडले हत्याकांड!
शहरातील बैरागी वाडा येथील टिंकू (वसीम) खान व शशांक गजभिये हे घटनेच्यावेळी मुस्लीम लायब्ररी चौकाकडून मिस्कीन टँककडे येणार्या रस्त्यावर उभे असताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या 4 जणांनी टिंकू खान व शशांक गजभिये यांचेवर चाकूने सपासप वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हत्यारे घटनास्थळावरून पसार झाले. शशांक गजभिये याचा जागीच मृत्यू झाला. तर टिंकू खान याला रूग्णालयात (Hospital) नेताना त्याचाही मृत्यू झाला. दुहेरी हत्याने भंडारा शहर हादरला. मुस्लीम लायब्ररी चौक परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व दोघांचेही प्रेत शवविच्छेदनाकरीता रूग्णालयात पाठविण्यात आले. मुस्लीम लायब्ररी चौकात व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
4 हत्यारे पोलिसांच्या ताब्यात!
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व माहिती जाणून घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवून या घटनेतील चार जणांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी या घटनेतील पैâजान झाकीर शेख, साहिल झाकीर शेख दोन्ही रा. बाबा मस्तानशहा वार्ड बैरागी वाडा भंडारा, प्रितम कैलास मेश्राम रा. नांदोरा व आयुष मुन्ना दहिवले रा. पेट्रोलपंप/ठाणा यांना ताब्यात घेऊन चौकशी (Inquiry) केली जात आहे. शहरात तणावपूर्ण स्थिती असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.