Yawatmal :- तालुक्यातील भामराजा येथील इंडियन बँक शाखेच्या(Indian Bank Branches) कर्मचार्यांकडून शेतकर्यांच्या घरी जाऊन कर्ज (loan) वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याने संतप्त शेतकर्यांच्या वतीने बुधवारी ६ ऑगस्ट रोजी बँकेच्या कार्यालयाला शेतकरी पुत्र कुणाल जतकर यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकर्यांनी कुलूप ठोकून आंदोलन करीत बँकेच्या वसूलीवर नाराजी व्यक्त केली.
फडणवीस सरकार सत्तेत येऊन काही महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Chief Minister Devendra Fadnavis) यांनी निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकार सत्तेत आल्यावर सर्व शेतकर्यांचे सरसकट कर्जमाफ करणार असे आश्वासन दिले होते. मात्र फडणवीस सरकार सत्तेत येऊन काही महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरीदेखील शेतकर्यांची कर्जमाफी करण्यात आली नाही. त्यात इंडियन बँकेच्या भांबराजा शाखेच्या कर्मचार्यांकडून कर्ज वसुलीसाठी शेतकर्यांच्या घरी जाऊन तगादा लावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी शेतकर्यांनी केला आहे. शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या मार्फत संपूर्ण राज्यात मागेल त्याला कर्जमुक्ती अभियान सुध्दा छेडले होते. लवकरच कर्जमुक्तीसाठी उच्च न्यायालयामध्ये(High Courts) जनहितार्थ याचिका सुध्दा दाखल करण्यात येणार आहे.
कुलूप ठोको आंदोलनात शेतकरी पुत्र कुणाल जतकर, बाळू राठोड, विठ्ठल मेश्राम, दिलीप जाधव, विक्की शिवणकर, अंकुश भराडे, दुर्गेश भिवणकर, आदींची उपस्थिती होती. बँक कर्मचारी कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहे. आम्हा शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती नसून आम्ही कर्ज भरू शकत नाही बँक कर्मचारी वारंवार घरी येऊन कर्ज भरण्यात यावे असे म्हणत आहे.