Gadchiroli :- अहेरी तालुक्यातील राजाराम गावातील ७६ वर्षीय शिवराम गोसाई बामनकर हे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाले आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली होती, जेव्हा ते आपल्या गाई चराईसाठी जंगलात(forest) गेले होते.
७६ व्या वर्षीही त्यांनी हिंमत न हारता कुर्हाडीने वाघाशी केले दोन हात
शिवराम बामनकर यांच्यावर वाघाने (tiger) अचानक हल्ला केला. मात्र, वयाच्या ७६ व्या वर्षीही त्यांनी हिंमत न हारता कुर्हाडीने वाघाशी दोन हात केले आणि त्याला पळवून लावले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने राजाराम, अहेरी, चंद्रपूर आणि त्यानंतर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात(Government Medical Colleges) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज, दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या मूळगावी राजाराम येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.