हिंगोली (Excise Department Action) : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात अवैध मद्य वाहतूक विरोधात छापे टाकून ५३ आरोपी विरोधात दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department Action) दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २.ते ८ऑक्टोबर या कालावधीत महात्मा गांधी सप्ताह निमित्त जिल्ह्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, भरारी पथक, तसेच दुय्यम निरीक्षक यांच्या पथकाने सेनगांव, कळमनुरी, हिंगोली, वसमत, औंढा परिसरात अवैध मद्य विक्री, वाहतुक विरोधात छापे टाकून ५३ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंद केले आहेत.
सदर कारवाईत देशी मद्याच्या १८० मिलीच्या १२९२ बाटल्या, विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या ३५ बाटल्या , हातभट्टी ८५ लिटर, रसायन ७६५ लिटर व ७ दुचाकी वाहन असा एकुण ५ लाख ६४ हजार ३१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ५३ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही (Excise Department Action) कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, भरारी पथकाचे निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक टी.बी.शेख, कृष्णकांत पुरी, प्रदिप गोणारकर, ज्योती गुट्टे तसेच स.दु.नि. कांबळे, जवान आडे, वाहनचालक वाघमारे आदींनी पार पाडली.