Yawatmal suicide :- आर्णी तालुक्यातील सावली सदोबा ग्रामीण भागात मागील अनेक दिवसापासून शेतकरी (Farmer) आत्महत्याचे प्रमाण वाढले असून, सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारी पणामुळे काल रात्री पळशी गावातील एका शेतकर्याने स्वतःच्या शेतात जाऊन विष (Poison) प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.
आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचे नाव अरविंद सूर्यभान धुर्वे (३८) असून त्यांच्यावर सहकारी सोसायटी कर्ज आहे. मागील काही दिवसापासून सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे तो नेहमीच विवंचनेत राहत असल्याने त्यांनी कर्जबाजारी पणामुळेच आत्महत्या केल्याची त्यांच्या कुटुंबांतील नातेवाईकांनी सांगितले, त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहे.