स्वत:च्या शेतात जांभळीच्या झाडाला घेतला गळफास
परभणीच्या चारठाणा पोलिसात नोंद
परभणी (Farmer Suicide) : चारठाणा येथे सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून १० जून रोजी सकाळी आठच्या सुमारास चारठाणा येथील अल्पभुधारक शेतकर्याने स्वत:च्या शेतात जांभळीच्या झाडाला गळफास घेतला. या (Farmer Suicide) प्रकरणी चारठाणा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
परसराम देविदास देशमुख वय ६० वर्ष, असे मयत शेतकर्याचे नाव आहे. चारठाणा येथील परसराम देशमुख हे अल्पभुधारक शेतकरी होते. (Farmer Suicide) त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. सततची नापिकी, कर्ज कसे फेडावे तसेच पेरणी जवळ आल्याने पेरणीसाठी पैसा कोठून आणावा या विवंचनेत त्यांनी स्वत:च्या शेतात जांभळाच्या झाडाला गळफास घेतला.
घटनेची माहिती रामेश्वर देशमुख यांनी पोलिसांना कळविली. सपोनि. सुनील अंधारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर येथे पाठविला. (Farmer Suicide) प्रकरणाचा तपास पोलीस जमादार माने करत आहेत. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.