निंबोळी अर्क व कृषी निविष्ठा समाविष्ट!
बार्शीटाकळी (Farmers) : बार्शीटाकळी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फवारणीसाठी दिलेले कीटकनाशके, जैविक खते, निंबोळी अर्क, कृषी निविष्ठा असे अनेक प्रकारचे तालुका कृषी कार्यालयातील (Taluk Agriculture Office) जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळून नष्ट केले असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.
औषध साठा वनिविष्ठा नष्ट करण्यात आल्याची गंभीर घटना!
बार्शीटाकळी शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर आळंदा व रुस्तमाबाद फाट्याला लागून शेकडो एकर जमिनीवर शासकीय कृषी चिकित्सिलय (Agricultural Clinic) परिसर आहे. सदर शेती पडीत पडली असून, काही जमिनीवर मोठमोठे झाडे आहेत. या संदर्भात दिनांक 18 जूनला आमचे प्रतिनिधीने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तालुका कृषी कार्यालयापासून खूप लांब अंतरावरपडीत जमिनीवर उंच व दाट झाडे असलेल्या शेततळ्यात शेतातील पाणी वाहून जाणाऱ्या खोल वर असलेल्या प्रवाहाच्या नाली मधील मध्यभागी, शासनाने शेतकऱ्यांना फवारणीसाठी (Spraying) दिलेले कीटकनाशके, जैविक खते व केम सारखी जहाल कीटकनाशके, निंबोळी अर्क व कृषी निविष्ठा मधील भरलेल्या बॉटलमधील द्रव्यरूप औषध (Liquid Drug) साठा जमिनीवर टाकण्यात आल्यानंतर, खोल नालीत भरलेल्या बॉटल व त्यावर रिकाम्या बॉटल काडी कचरा टाकून सदर औषध साठा वनिविष्ठा नष्ट करण्यात आल्याची गंभीर घटना घडली.
विविध प्रकारच्या औषधीच्या बॉटल पडलेल्या असल्याचे निदर्शनास!
दुसरे महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शेततळ्यात सुद्धा असे साहित्य नष्ट करण्यात आल्याचे प्रयत्न झाले असून या ठिकाणी दारूच्या, बिअरच्या व पाण्याच्या रिकाम्या बॉटल व विविध प्रकारच्या औषधीच्या बॉटल पडलेल्या असल्याचे निदर्शनास येते. कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष घातले असते, तर सदर साहित्य शेतकऱ्यांच्या उपयोगात आले असते परंतु तसे का झाले नाही. विशेष म्हणजे कृषी अधिकारी (Agricultural Officer) व कर्मचाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांनाच या कार्यालयातील कृषी निविष्ठा व साहित्यांचे वितरण होत असते. अशा प्रकारचा आरोप तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचा आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून विविध पिकावर उपाययोजना (Measures) करण्यासाठी तयार केलेले माहिती पत्रके (Information Sheets) सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात न लावता कार्यालयाच्या बाहेर बेवारसपणे पडले आहेत.
सदर साहित्य गोदामा मध्ये ठेवलेले, परंतु साहित्य दाखविण्यास नकार!
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या हितासाठी गतिमान व पारदर्शक प्रशासन असावे म्हणून या कार्यालयाचे नूतनीकरण व नवीन साहित्याची खरेदी करण्यात आली. परंतु, या कार्यालयात पूर्वीचे वापरण्यायोग्य असलेले या कार्यालयात पूर्वीचे असलेले जुने साहित्य कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले असून, यातील काही साहित्य लंपास झाल्याचे समजते. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, सदर साहित्य गोदामा मध्ये ठेवलेले आहेत. परंतु सदर साहित्य दाखविण्यास नकार दिला आहे.
साहित्य सध्या स्थितीला उपलब्ध आहे किंवा ते गहाळ झाले याची सखोल चौकशी!
शासनाने (Government) शेतकरी यांना वाटपासाठी दिलेली कीटकनाशके व सदर शेतकऱ्याच्या शेतात माहितीपत्रके का लावण्यात आली नाहीत आणि पूर्वीच्या कार्यालयातील विविध प्रकारचे साहित्य सध्या स्थितीला उपलब्ध आहे किंवा ते गहाळ झाले याची सखोल चौकशी केल्यास या विभागातील अनेक गैरप्रकार, व नियमबाह्य कामे उघड होतील.