शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यास अडचनी!
कोरेगाव, चोप (Farmers) : देसाईगंज तालुक्यात 10 जुलैपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील रोवणीचे कामे ठप्प पडले, तर आवत्या करपलेल्या आहेत, विजेच्या जास्त वापर होत असल्याने वारंवार वीजप्रवाह खंडित होत आहे व दाब कमी असल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यास अडचनी येत आहेत.
अनेकांच्या कोरडवाहू शेतातील पाणी ओसरले!
29 जुन ते 10 जुलै पर्यंत, तालुक्यात अतीवृष्ठी (Heavy Rain) झाल्याने शेती व नदी, नाले तूडूंब भरून वाहत होते शेतकऱ्यांनी शेताचे बांध खुले केले होते आणि अचानक 10 जुलैपासून पावसाने दडी मारल्याणे कोरेगाव, चोप व परिसरातील अनेकांच्या कोरडवाहू शेतातील पाणी ओसरले. पावसाअभावी अनेकांच्या शेतातील धान पिक रोवणी खोळंबली, तर आवत्या पाण्याअभावी करपलेल्या गेलेल्या आहेत. ज्यांना पाण्याची सोय आहे त्यांना पण अनेक अडचनीनां सामोरे जावे लागत आहे. विजेची (Electricity) मागणी जास्त वाढल्याने व कमी दाब मिळत असल्याने वारंवार विज पुरवठा खंडीत होत असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात शेतीला पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकरी (Farmer) संकटात आलेला आहे.