हिंगोली (Hingoli NCP party) : जून रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली या ठिकाणी जिल्हाध्यक्ष बि. डी. बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजूभाऊ नवघरे यांच्या नेतृत्वा च्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न करण्यात आली.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील जिल्हा कार्याकारणी, संपूर्ण सेलचे जिल्हाध्यक्ष त्यांची कार्यकारणी (Hingoli NCP party) हिंगोली शहराचे शहराध्यक्ष आणि त्यांची कार्यकारणी संपूर्ण तालुक्याचे तालुकाध्यक्ष आणि त्यांची कार्यकारणी तसेच विविध सेवा अधिनियमानुसार स्थापित असलेल्या संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारणी अशा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शासकीय विश्रामगृह हिंगोली या ठिकाणी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने पाच मुद्द्यावर जिल्हाध्यक्ष बि.डी. बांगर आणि आमदार राजु नवघरे यांनी संपूर्ण कार्यकर्त्याला मार्गदर्शन करून उत्स्फूर्त अशी प्रेरणा देण्यात आली.
यामध्ये क्रियाशील व प्राथमिक सदस्याची नोंदणी, संदर्भामध्ये सदस्य नोंदणीचा आढावा अन्य बाबी निश्चित करण्यात आल्या ज्यामध्ये सर्व सेल व विभागाचे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हा कार्यकारणी मधील कार्याचे पूर्ण माहिती सादर करणे. 10 जून 2025 रोजी (Hingoli NCP party) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या करते आणि छत्रपती क्रिडा संकुलन बालेवाडी पुणे या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आणि आमदार राजू नवघरे यांनी केली.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा नियोजित करण्यात आलेला आहे या दौऱ्याच्या निमित्ताने विशिष्ट पक्ष प्रवेश सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत त्याकरता सुद्धा कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष द्यावे हे सुद्धा नियोजित करण्यात आले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हिंगोली नगरपालिका वसमत नगरपालिका आणि कळमनुरी नगरपालिका व जिल्हा परिषद हिंगोली (Hingoli NCP party) आणि पाचवी तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भामध्ये पूर्वतयारी करून भूत कमिटी सही संपूर्ण सदस्यांची नोंदणी करून पदाधिकाऱ्यांना संपूर्ण जागा लढवण्यासाठी तयार करणे याकरता सुद्धा बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट विजय राऊत यांनी केले तर कार्यक्रमातील आभार संजय दराडे दराडे यांनी मानले. व संपूर्ण कार्यक्रम हा शासकीय विश्रामगृह यांच्या सभागृहात प्रचंड कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि या मध्ये सर्वांनी जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर आणि आमदार राजू नवघरे यांच्या सूचनेचे पालन करून समोरील काम करण्याचे संपूर्ण कार्यकर्त्यांनी उत्साह आणि सहभाग नोंदवून मान्य केले आणि त्यांच्या समस्या सुद्धा विचारून त्यावर उपाययोजना सांगून पुढील कार्यामध्ये सुरुवात केली. या (Hingoli NCP party) कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ची पायाभरणी, कार्यभारणी जिल्ह्यामध्ये चालू आहे पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले.