गडचिरोली (Gadchiroli Clerk Suicide) : पंचायत समिती गडचिरोली येथील कार्यरत कनिष्ठ लिपिक पदावर असलेले अशोक हलामी ( ५४)यांनी रामनगर गडचिरोली येथे भाड्याच्या खोलीतच दि. १३ जुन २०२५ सांयकाळी ६ वाजता पंख्याला टॉवेल बांधुन (Gadchiroli Clerk Suicide) गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली. अशोक हलामी हे पं. स. गडचिरोली येथे आवक-जावक विभागाचे काम पाहत होता. परंतु दारूच्या नशेत ते ड्युटी बरोबर करीत नसल्यामुळे त्यांचा पगारही मिळत नव्हता. त्यांनी दारुच्या आहारी जावून रामनगर येथील किरायाच्या रुममधे गळफास घेऊन आत्महत्या केली.
अशोक हलामी यांचे मुळगांव देवलवाई आहे. परंतु त्यांनी धानोरा येथे घर बांधले.त्यांच्या मागे मुले – बाळ नसुन म्हातारी आई व पत्नी असा परिवार आहे.
पत्नीच्या रिपोर्टवरून (Gadchiroli Clerk Suicide) गडचिरोली पोलीसांनी मर्म दाखल करून प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविले. अधिक तपास सुरु आहे.