कोरची तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!
कोरची (Girls Rape) : रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना देव समजले जाते. मात्र, गेल्या काही वर्षात याच डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कोरची – तालुक्यात उघडकीस आली आहे. उपचाराच्या (Treatment) नावाखाली खासगी बोगस डॉक्टरने एका तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना बुधवारी (दि.2) सकाळी 9 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोरी येथे घडली आहे.
उपचाराच्या बहाण्याने चेकअप बेडवर झोपवून तिच्याशी गैरवर्तणूक केले!
याप्रकरणी बेडगाव पोलिसांनी बोगस डॉ. सुभाष हरप्रसाद बिश्वास (48, रा. बोरी, ता. कोरची) याला अटक केली आहे. बेडगाव पोलिसांनी (Bedgaon Police) दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील 26 वर्षीय पीडित तरुणीला जुलाबाचा त्रास होत असल्याने ती आपल्या भावासोबत तालुक्यातील बोरी येथील आरोपी खासगी बोगस डॉ. सुभाष बिश्वास यांच्या रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी आली होती. उपचाराच्या (Treatment) बहाण्याने आरोपी डॉक्टरने (Doctor) तिला कॅबिनमधील चेकअप बेडवर झोपवून तिच्याशी गैरवर्तणूक केले. तिने आरडाओरड करताच तरुणीचा भाऊ केबिनमध्ये धावून आला. यावेळी डॉक्टरने तिच्या भावासोबतही बाचाबाची केली. तत्काळ पीडित तरुणीने बेडगाव पोलिस मदत केंद्र गाठून डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली. पीडितीच्या तक्रारीवरून डॉ. सुभाष बिश्वास यांच्यावर कलम 64 (2) (ई) भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल (Filed a Case) करीत आरोपीला अटक केली. वैद्यकीय अहवालासाठी पीडित तरुणीला जिल्हा सामान्य रुग्णालय (District General Hospital) गडचिरोली येथे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास बेडगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक वर्षा बोरसे करीत आहेत. Mcr झाल आहे, चंद्रपुर जेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे.