आमगाव (Gondia) :- जिल्ह्यातील आमगाव शहरांमध्ये हृदय स्थळ असलेल्या आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण (Encroachment) झालं होतं. या अतिक्रमण झालेल्या अनेक ठिकाण होते परंतु आज अतिक्रमण जागेवर असलेल्या दोन फळ विक्रेत्यांमध्ये आपसी वादातून दोघांनी एकमेकाला मारहाण केली. यामध्ये आणि सुमित गणवीर,मुकेश बनसोड हे दोघेही आपसात मारहाण केल्यामुळे जखमी झाले. तर यात तिसरा सुमित गणवीर यांचे वडील हे यात जखमी झाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने एकतर्फा कारवाई करत दोन्ही दुकानाचे अतिक्रमण पाडले….
याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) यांनी कारवाई करत या दोन्ही दुकानदारांना अतिक्रमण तोडून पाडलं, पण यावेळी कारवाई करताना मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने एकतर्फी भूमिका घेत फक्त या भांडण करणाऱ्या दोन दुकानदारांना हटवलं. मात्र आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून यामध्ये केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते परंतु याकडे पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश पाहायला मिळाला. यावेळी आमगाव शहरामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या सर्व ठिकाकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी अतिक्रमण काढतांना तणावाची परिस्थिती निर्माण झाली असता पोलीस विभागाने नागरिकांना सावध करीत कार्यवाही पूर्ण केली.