अन्यथा १५ सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा यांचा इशारा
मानोरा (Gram Panchayat) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले वादग्रस्त ग्राम सचिव गैबीनाथ केशव दिघोळे यांच्या अधिनस्त असलेल्या चोंढ, तळप बु, जनुना खुर्द व आसोला खुर्द ग्राम पंचायतीची (Gram Panchayat) सखोल तपासणी करावी, पंचायत समितीच्या मासिक सभेत केलेल्या १ ते ४ दोषारोप नुसार कार्यवाही करावी, तसेच महीला सभापतीच्या अधिकाऱ्यावर गदा आणणाऱ्यावर सखोल चौकशी करून कार्यवाही करावी, अन्यथा १६ सप्टेंबर पासून जिल्हा परिषद कार्यालय प्रांगणात आमरण उपोषणाला बसणार असे इशाऱ्याचे तक्रार निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना प. स. च्या सभापती सुजाता अरूण जाधव (Sujata Jadhav) यांनी दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका गावात शोष खड्डे प्रकरण प्राप्त तक्रारीवरून गट विकास अधिकारी यांच्यासह तपासणी करीता गावात हजर झाले असता सचिव दिघोडे असभ्य भाषेत उडवाउडवीची उत्तर दिले. यावेळी आमच्या समक्ष लाभार्थी नागरिकांनी प्रश्न विचारले असता पिण्याचे पाणी व वीज बंद करतो असे सांगितले. ही बाब अत्यंत खेदजनक आहे.
सदरील प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी दि. २८ ऑगस्ट रोजी मी, पंचायत समिती कार्यालय येथे मासिक सभेकरिता उपस्थित असताना सरपंच यांचे सासरे यांनी सचिव दोघोडे यांच्या सांगण्यावरून गावातील २० ते २५ लोकांना माझ्या दालनात पाठवून काल तुम्ही कशाची पाहणी केली, आम्हाला माहिती आताच द्या, असे सांगत मला धमकवण्याचे प्रयत्न केले. सचिव दिघोडे यांच्या गैर वर्तनुकीबाबत मासिक सभेत यापूर्वी दि. १५ जून २०२२ मध्ये ठराव क्रमांक ४ ( ४ ) नुसार त्यांचेवर त्यांचेवर कार्यवाही करणेकरीता व त्यांना मानोरा तालुक्याच्या बाहेर पदस्थापना देण्याकरिता त्यांचे दोषारोप पत्र १ ते ४ तयार करून जिल्हा परिषद कार्यालयात आपणाकडे सादर करण्यात आला असुन अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.
मी महीला सभापती पदावर असुन माझ्यासोबत सचिव यांनी गैर वर्तणूक असभ्य वागणूक देत असेल तर इतर गावातील नागरीकांना कश्या प्रकारची वागणूक देत असेल याचा बोध होणे गरजेचे असल्याने आपल्या स्तरावरून संबंधित सचिव यांच्या अधिनिस्त असलेल्या (Gram Panchayat) ग्राम पंचायतीची आपल्या स्तरावरून समिती गठीत करून त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाची सखोल चौकशी व तपासणी करण्यात यावी व मानोरा तालुक्याच्या बाहेर इतरत्र ठिकाणी बदली करण्यात यावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असे निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व गट विकास अधिकारी यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.