हिंगोली (Hingoli Khandelwal Jewelers) : तयार आभूषणांचे जिल्ह्यातील सर्वात मोठे शोरुम असलेल्या खंडेलवाल ज्वेलर्स इंडिया लि. चे हिंगोलीत दालनाचे रविवारी थाटात उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी या आधुनिक दालनात ग्राहकांची झुंबड पहावयास मिळाली.
विदर्भात यापूर्वी सहा शाखा असलेल्या (Hingoli Khandelwal Jewelers) खंडेलवाल ज्वेलर्स इंडिया लि.ची सातवी शाखा रविवारी हिंगोलीत सुरु झाली. हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, बाबाराव बांगर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.या प्रमुख पाहुण्यासह व्यापारी महासंघाचे अनिल नैनवाणी, सुरेशचंद्र सोनी, गोपाल दुबे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बसंतकुमार भट्ट, डॉ. विजय निलावार, ओमप्रकाश खंडेलवाल, संजय खंडेलवाल,पवन उपाध्याय, उत्तमराव जगताप, संतोष अग्रवाल, फटाले, सचिन शिंदे आदींनी भेट देवून खंडेलवाल कुटूंबियांना शुभेच्छा दिल्या.
शहराच्या मध्यभागी गांधी चौक येथे उभारण्यात आलेल्या तीन मजली भव्य वास्तूमध्ये सोने, चांदी, हिरे, मोती व प्लॅटीनमच्या दागिन्यांनी सजलेले शोरुम हिंगोलीकरांना चांगलेच भावले.
उद्घाटनाच्या दिवशीच या ठिकाणी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. शुभारंभ व दसरा महोत्सवानिमित्त (Hingoli Khandelwal Jewelers) खंडेलवाल ज्वेलर्सतर्फे २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत ‘लकी लक्ष्मी’ योजना सुरु करण्यात आली असून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संचालक राजकुमार खंडेलवाल यांनी सांगितले. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, खंडेलवाल ज्वेलर्सच्या शोरुममध्ये विकल्या जाणार्या सोन्याच्या प्रत्येक दागिन्यावर बीआयएस हॉलमार्क असते. शिवाय शंभर टक्के परत खरेदी ची खात्री सुध्दा खंडेलवाल ज्वेलर्स तर्फे देण्यात येते. यामुळे एखाद्या ग्राहकाने खरेदी केलेले सोने परत विकायचे असेल तर ‘बट्टा’ कपातीमुळे ग्राहकाला नुकसान होत नाही.
हिंगोलीत सुरु झालेल्या अद्ययावत दालनाचा उद््घाटन सोहळा २८ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत चालणार असल्याची माहिती संचालक राजकुमार खंडेलवाल यांनी दिली. यावेळी वैभव खंडेलवाल, नयन खंडेलवाल, मनिष खंडेलवाल, प्रविण खंडेलवाल, विजय खंडेलवाल, रुपचंद खंडेलवाल, दिपक खंडेलवाल, शुभम खंडेलवाल, पियुष खंडेलवाल, कैलाश खंडेलवाल, उमेश खंडेलवाल आदी उपस्थित होते.