वसमत (Grocery Store Fire) : तालुक्यातील भोरीपगाव येथील आत्माराम ससे यांच्या किराणा दुकानाला १९ जूनला सकाळच्या सुमारास आग लागल्याने सर्व किराणा सामान जळून खाक झाले. आग भडकल्याने वसमतच्या अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग विझवली.
भोरीपगाव येथील मुख्य रस्त्यावर आत्माराम ससे यांचे किराणा दुकान असुन १९ जून रोजी सकाळच्या सुमारास अचानक (Grocery Store Fire) किराणा दुकानाला आग लागून संपूर्ण सामान जळून खाक झाले. लागलेल्या आगीमुळे घरातील ससे कुटूंबीयांनी तात्काळ बाहेर धाव घेतली. वार्यामुळे अधिकच आग वाढत असल्याने उपसरपंच अनिल आगलावे, गोरख पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर पाण्याचा मारा चालू केला.
आग आटोक्यात येत नसल्याने वसमत नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून तब्बल दिड ते दोन तासानंतर (Grocery Store Fire) आग विझविण्यात यश मिळविले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु या आगीत कोणतीही जीवीत हाणी झाली नाही.