पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचे प्रयत्न
उमरी येथील प्राचीन शंकर मंदिर, पोहणा येथील शिव मंदिर, रसुलाबाद येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा समावेश
वर्धा (Minister Dr. Pankaj Bhoyar) : शहरालगतच्या उमरी (मेघे) येथील प्राचीन शिव मंदिरासह हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथील रूद्धेश्वर व आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर (Minister Dr. Pankaj Bhoyar) यांच्या प्रयत्नामुळे तिन्ही श्रद्धास्थानांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
उमरी (मेघे) गाव हे वर्धा शहराला लागून असून गावात प्राचीन असे शिव मंदिर आहे. या मंदिराला ९०० वर्षाचा इतिहास आहे. जुन्या जानकारांच्या मते मंदिराला प्राचीन असा इतिहास लाभला आहे. त्यामुळे महाशिवरात्री जवळपास एक लाख भाविकांची दर्शनसाठी गर्दी असते. यासह इतर दिवशीही भक्तांची गर्दी राहते. मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
बारसीला तब्बल ८० हजार नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात. उमरी येथील मंदिराला सुमारे ९०० वर्षांचा इतिहास आहे. नागासाधूंनी शिव मंदिराची स्थापना केल्याचे सांगितले जाते. नागा साधूंपैकी एक निरंजन महाराज गावात स्थाईक झाले. त्यांनी या मंदिराच्या उभारणीत सिंहाचा वाटा घेतला. निरंजन महाराज यांना साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी रथाची निर्मिती केली. या रथावर शंकर पार्वती, गणेश, हनुमान, नारद, विश्वमित्र यांच्या प्रतिमा आहे.
महाशिवरात्रीच्या दुसर्या दिवशी या रथाची रात्री १२ वाजता मिरवणूक काढण्यात येते. रथयात्रेत शेकडों भविक सहभागी होत असतात. ही परंपरा निरंजन महाराज यांच्या काळापासून आजतागायत कायम आहे. महाशिवरात्रीच्या दुस-या भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. गावातील नागरिकांसह वर्धा शहर व परिसरातील गावामधील नागरिक महाप्रसादाचा आस्वाद घेतात.
जिल्ह्यातीतील तिर्थक्षेत्राच्या विकासाला प्राधान्य
जिल्ह्यात अनेक प्राचीन तीर्थस्थळ आहे. सोबतच बोर प्रकल्पासह अन्य पर्यटन स्थळ आहे. या स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. काही स्थळांना तीर्थ व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. तर काही स्थळांची दर्जोन्नती करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना चांगल्या सुविधा मिळणार आहे. या उमरी येथील शिव मंदिर,पोहणा येथील रूद्रेश्वर मंदिर व रसुलाबाद येथील श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिराला तिर्थस्थळांचा ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. लवकरच मंदिराच्या विकासासाठी निधी देण्यात येऊन भक्तांच्या गरजा नुसार सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
डॉ. पंकज भोयर- पालकमंत्री वर्धा
उमरी (मेघे) येथील प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्री १ लाख पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा मिळावा, यासाठी मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री डॉ. पकंज भोयर (Minister Dr. Pankaj Bhoyar) यांच्याकडे मागणी केली होती. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे हा ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्याबद्दल आभार व्यक्त करतो.
सचिन खोसे, अध्यक्ष श्री शंकर देवस्थान उमरी तथा उपसरपंच
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर (Minister Dr. Pankaj Bhoyar) यांची देखील या मंदिरावर विशेष श्रद्धा आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे प्राचीन शिवमंदिराला तीर्थस्थळाचा क दर्जा प्राप्त झाला. त्यांच्या प्रयत्नामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, पथदीप, भक्तांसाठी सभागृह, प्रसाधनगृह यासह अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या. मंदिरात सतत असणारी भक्तांची रिघ बघता तीर्थस्थळाचा ब दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी देखील पालकमंत्री भोयर यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने उमरी येथील शिव मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा दिला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथे वर्धा नदीच्या तिरावर असलेल्या रूद्रेश्वर मंदिराला प्राचीन इतिहास आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते. विदर्भातील प्रमुख शिवमंदिरापैकी एक मंदिर म्हणून मंदिर ओळखल्या जाते. मंदिरात विशाल शिवपिंड असून त्यामध्ये सव्वा खंडी धान्य जमा होऊ शकते, असे म्हटल्या जाते. मंदिरात ब्रम्ह देवाची देखील मूर्ती आहे.
हेमांडपंथी मंदिर असून या मंदिराचा देखील ब वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. रसुलाबाद येथे प्राचीन विठ्ठल रूक्मिणी मंदिर आहे. या मंदिराला देखील प्राचीन इतिहास लाभला आहे. राज्य शासनाने तिन्ही मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा दिल्याने या मंदिराच्या विकासाला चालना मिळणार आहे.