५१ हजाराचा निधी अतिवृष्टीग्रस्तासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला!
हिंगोली (CM Relief Fund) : हिंगोली येथील उद्योजक रमेशचंद्र बगडीया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ५१ हजाराचा निधी अतिवृष्टीग्रस्तासाठी (Heavy Rains) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला असुन छत्रपती संभाजी नगर येथे त्याचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे रमेशचंद्र बगडीया यांनी सुपूर्द केला आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. गजानन घुगे, महिला जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपाचे जिल्हा सचिव उमेश नागरे तसेच सुनील रमेशचंद्र बगडिया, आशुतोष सुनील बगडिया यांची उपस्थिती होती.