Yawatmal :- बाभुळगाव तालुक्यातील प्रतिष्ठित गाव सरूळ येथील माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्राध्यापक भीमसिंह बाबू सोळंके यांचे हृदय विकाराने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांनी नागपूर येथील प्राध्यापकिला राम राम ठोकून यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.
डॉक्टरांनी मृत घोषित करून सोळंके परिवार व जिल्ह्याला मोठा दिला धक्का
आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल पटू (International volleyball player) म्हणून त्यांची ओळख होती. गावचे पोलीस पाटील पदी राहून जनसेवेचे व्रत हाती घेतले व नंतर पुरोगामी लोकशाही आघाडीचे कार्य हाती घेऊन त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. येथून शेतकरी संघटना चे नेतृत्व करून शेतकर्यांसाठी कारागृह सुद्धा पाहिले. त्यानंतर भूविकास बँकेचे संचालक, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, व नंतर जिल्हा परिषद यवतमाळ चे आरोग्य व शिक्षण सभापती अशी नानाविध पदावर राहून जनतेची सेवा केली. आज सकाळी ८ वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने यवतमाळ ( क्रिटी केअर हॉस्पिटल) येथे हलविण्यात आले.
मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत (Dead) घोषित करून सोळंके परिवार व जिल्ह्याला मोठा धक्का दिला. त्यांचे पश्चात धर्मपत्नी आशाताई, अमित, आशिष, आदेश, अंकुश ही चार मुले, चार सुना, नातू- पणतू व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचेवर घारफळ रोडवरील शेतात उद्या सकाळी ८ जुलै ९ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.