हिंगोली शासकीय रुग्णालय

हिंगोलीतील शासकीय रुग्णालयातील बेवारस रुग्णाला प्रभारी सहाय्यक अधिसेविकेकडून मानवीय मदत

Hingoli Government Hospital: राऊंडवर असताना घाणीने माखलेल्या एका बेवारस व्यक्तीला पाहून प्रभारी सहाय्यक अधिसेविका आशा क्षीरसागर यांनी तातडीने मदत केली.

हिंगोलीतील शासकीय रुग्णालयातील बेवारस रुग्णाला प्रभारी सहाय्यक अधिसेविकेकडून मानवीय मदत

Hingoli Government Hospital

हिंगोली (Hingoli Government Hospital) : माणुसकीला उजाळा देणारी घटना २७ जुलै सोमवार रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात घडली. राऊंडवर असताना घाणीने माखलेल्या एका बेवारस व्यक्तीला पाहून प्रभारी सहाय्यक अधिसेविका आशा क्षीरसागर यांनी तातडीने मदत केली. त्यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला स्वच्छ करून उपचारासाठी दाखल करण्यात आले.
 
प्र. सहाय्यक अधिसेविका आशा क्षीरसागर या रुग्णालयात राऊंड घेत असताना शिवभोजन केंद्राजवळ गेल्या असता त्यांना एक व्यक्ती घाणीमध्ये पडलेला दिसला. त्या व्यक्तीने अंगावर विष्टा केली होती आणि अत्यंत दयनीय अवस्थेत होता.

परिस्थिती पाहून क्षीरसागर यांनी वेळ न दवडता त्या व्यक्तीला तात्काळ अपघात विभागात नेले. तेथे त्याला आंघोळ घालण्यात आली आणि परिसर स्वच्छ करण्यास सांगितले.या कामात अपघात विभागातील इंचार्ज सिस्टर विणकरे, स्मार्ट सर्विस सुपरवायजर सिद्धार्थ घोंगडे, जिल्हा रुग्णालयातील प्रभारी मुकादम अरविंद थोरात, अपघात विभागातील कक्ष सेवक सादखान पठाण, अवधूत ढाकरे, सफाईगार सतीश कदम आणि महेश मस्के यांनी मोलाचे सहकार्य केले.

कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीशी संवाद साधून त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव गुलाबराव धोकणे रा. बेलोरा असे सांगितले.सध्या गुलाबराव धोकणे यांच्यावर डॉ. राठोड यांच्या देखरेखीखाली अपघात विभागात पुढील उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत दिली जात आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बेवारस व्यक्तीला दिलेल्या तातडीच्या मदतीचे आणि संवेदनशीलतेने घेतलेल्या पुढाकाराचे नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा 9-7-7 फॉर्म्युला? राष्ट्रवादी 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांची चर्चा

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा 9-7-7 फॉर्म्युला? राष्ट्रवादी 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांची चर्चा

गोकुळ निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू. राष्ट्रवादीला 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांच्या सूत्रावर चर्चा; अंतिम निर्णय फडणवीसांकडे.

Oct 02, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026
ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांविरोधात याचिका; SIR चौकशीसाठी स्वतंत्र समितीची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांविरोधात याचिका; SIR चौकशीसाठी स्वतंत्र समितीची मागणी

SIR प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका. स्वतंत्र समिती, मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी.

Sep 26, 2026
लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी; उपाययोजनांना सुरुवात, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची फडणवीसांची ग्वाही

लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी; उपाययोजनांना सुरुवात, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची फडणवीसांची ग्वाही

लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उपाययोजनांना सुरुवात झाल्याचे सांगितले. मराठवाडा वॉटर ग्रीडचा डीपीआर डिसेंबरपर्यंत अपेक्षित.

Sep 23, 2026
अमित शहांची प्रकृती अस्वस्थ; दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा रद्द

अमित शहांची प्रकृती अस्वस्थ; दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा १९-२० सप्टेंबरचा कोल्हापूर दौरा प्रकृती अस्वस्थ झाल्याने रद्द करण्यात आला. हुपरीतील ६०० कोटींच्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे भूमिपूजन नियोजित होते.

Sep 19, 2026