Gokul Election 2026

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा 9-7-7 फॉर्म्युला? राष्ट्रवादी 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांची चर्चा

गोकुळ निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू. राष्ट्रवादीला 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांच्या सूत्रावर चर्चा; अंतिम निर्णय फडणवीसांकडे.

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा 9-7-7 फॉर्म्युला? राष्ट्रवादी 9, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 जागांची चर्चा

Gokul Election 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत जागावाटपावर चर्चा; राजेंद्र पाटील-यड्रावकर गटासाठीही जागेचा प्रस्ताव

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 9, भाजपला 7 आणि शिवसेनेला 7 जागा देण्याच्या सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा फॉर्म्युला अद्याप अंतिम झालेला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

बुधवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत गोकुळच्या निवडणुकीतील जागावाटपाबाबत विविध पक्षांनी आपापल्या मागण्या मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 10, तर भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी 8 जागांची मागणी केल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. जनसुराज्य शक्ती पक्षानेही जागांची मागणी केली आहे. त्यामुळे 25 जागांच्या गोकुळच्या निवडणुकीत जागावाटपाचे गणित जुळवताना महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. 

या चर्चेतून राष्ट्रवादी काँग्रेसला 9, भाजपला 7 आणि शिवसेनेला 7 जागा देण्याच्या सूत्राची चर्चा पुढे आली आहे. मात्र, प्रत्यक्ष जागावाटपात शिवसेनेच्या कोट्यातून काही जागा सहयोगी गटांना देण्याची शक्यता असल्याने अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. त्यामुळे सध्या चर्चेत असलेला 9-7-7 फॉर्म्युला हा अंतिम निर्णय नसल्याचे स्पष्ट आहे. 

राजेंद्र पाटील-यड्रावकर गटासाठी जागा

शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटालाही गोकुळ निवडणुकीत एक जागा देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. यड्रावकर हे शिवसेनेचे सहयोगी आमदार असून त्यांच्या गटासाठी जागा निश्चित करण्याबाबत महायुतीच्या चर्चेत विचार करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार ही जागा शिवसेनेच्या वाट्यातून दिली जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत ठरावधारकांच्या संख्येवरूनही मतभेद झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून विविध ठरावांवर दावे करण्यात आल्याने पक्षांमध्ये एकमत होण्यात अडचणी आल्या. या पार्श्वभूमीवर अंतिम निर्णय पक्षीय मागण्या आणि उपलब्ध राजकीय समीकरणांचा विचार करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीने एकत्रितपणे लढण्याची भूमिका घेतली असली, तरी जागावाटपावरून घटक पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. त्यामुळे मुंबईतील बैठकीनंतरही अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. 

गोकुळ दूध संघाची 2026-2031 निवडणूक प्रक्रिया सुरू असून संघाने 15 सप्टेंबर 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. Gokul Milk आता महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय ठरतो आणि कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळतात, याकडे कोल्हापूरच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर; नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

BJP Legislative Council Candidate: राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र. भारतीय जनता पक्षानेही तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली..

Oct 04, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026