Amit Shah

अमित शहांची प्रकृती अस्वस्थ; दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा १९-२० सप्टेंबरचा कोल्हापूर दौरा प्रकृती अस्वस्थ झाल्याने रद्द करण्यात आला. हुपरीतील ६०० कोटींच्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे भूमिपूजन नियोजित होते.

अमित शहांची प्रकृती अस्वस्थ; दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा रद्द

Amit Shah

हुबळीहून थेट दिल्लीकडे रवाना; दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावलेले स्वागताचे फलक हटवण्यास सुरुवात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा १९ आणि २० सप्टेंबरचा नियोजित कोल्हापूर दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. हुबळी येथे असताना त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर पुढील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते हुबळीहून दिल्लीकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे.

अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी शहरासह हुपरी परिसरात मोठी तयारी करण्यात आली होती. स्थानिक नेत्यांकडून स्वागताचे फ्लेक्स आणि बॅनर उभारण्यात आले होते, तर प्रशासनाकडूनही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मात्र दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आल्यानंतर हे फलक आणि बॅनर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हुपरीतील ६०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्यात हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते. शून्य कचरा आणि ‘वेस्ट टू बेस्ट’ संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

या प्रकल्पात साखर उद्योगातून निर्माण होणाऱ्या बगॅस, मळी आणि स्पेंट वॉश यांसारख्या उपउत्पादनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची योजना आहे. अमित शहा यांच्या हस्ते २० सप्टेंबर रोजी या प्रकल्पाची पायाभरणी होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते.

एकसंबा येथील कार्यक्रमही नियोजित

कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथेही अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार होता. याशिवाय त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात विविध विकासकामांशी संबंधित कार्यक्रमांचा समावेश होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीची शक्यता

अमित शहा यांच्या अनुपस्थितीत हुपरीतील नियोजित कार्यक्रमाचे काय होणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली होती. अमित शहा यांच्या ऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026