पिकेही आली पाण्याखाली!
मानोरा (Heavy Rain) : तालुक्यातील मौजे विठोली परिसरात दि. १८ ते २० ऑगस्ट रोजी पर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने मौजे विठोली शिवारातील गट नं. २५ शेतातील सिंचन विहीर पूर्णपणे खचून गेली असुन शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली आली आहेत. याबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन तहसीलदार यांना दि. २१ ऑगस्ट रोजी पिडीत शेतकरी (Farmer) नितीन अरुणराव इंगोले यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांचे 8 ते 10 लाखाचे नुकसान!
निवेदनात नमूद केले आहे की, विठोली परिसरात दि. १८ ऑगस्ट ते २० ऑगस्ट पर्यंत ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने कहर केला. या संततधार पावसाने मौजे विठोली शिवारातील गट नं. २५ मधील ५० फूट खोल व ३२ फुट रुंद सिंचन विहीर पूर्णतः खचली असून शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली आली आहेत. या नैसर्गिक हानीत शेतकऱ्यांचे ८ ते १० लक्ष रुपयाचे नुकसान झाले असल्याने तात्काळ पंचनामा करून शासनाची (Government) आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकऱ्यांनी तहसीलदार याजकडे केली आहे.