तहसीलदार यांना निवेदन!
मानोरा (Heavy Rain) : तालुक्यातील पोहरादेवी येथे माहे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घुसून अनेक नागरिकांच्या घराचे व संसार उपयोगी वस्तूचे अतोनात नुकसान झाले आहे. यासंदर्भात सबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले आहेत. मात्र अद्यापपर्यंत पूर नुकसानग्रस्त बाधीत नागरिकांना शासनाची (Government) मदत मिळालेली नाही. त्यामुळे तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अन्यथा तहसिल कचेरीवर आमरण उपोषण करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार डॉ संतोष यावलीकर (Tehsildar Dr. Santosh Yavalikar) यांना दि. १३ ऑक्टोबर रोजी माँटी महाराज राठोड यांनी दिले आहे.
आमरण उपोषण करण्याचा इशारा!
निवेदनानुसार पोहरादेवी येथे माहे ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये एक वेळा नव्हे तर चार वेळा ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे पूर आला. पुराचे पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या (Citizens) घराची पडझड झाली असुन घरातील संसार उपयोगी साहित्य कपडे, धान्य आदींचे अतोनात नुकसान होऊन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. यासंदर्भात पटवारी, ग्रामविकास अधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. पण नुकसानीचा अहवाल सादर न केल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे तात्काळ नैसर्गिक आपत्तीची पूर बाधिताना नुकसान भरपाई (Compensation For Damages) द्यावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांचीही उपस्थिती होती.