उमरखेड (Anil Deshmukh) : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु राज्य सरकारकडुन देण्यात येणारी मदत ही अतिशय कमी आहे. शेतकर्यांना पुन्हा जर उभे करायचे असेल तर त्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. ज्यापध्दतीने पंजाब राज्याने तेथील शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत जाहीर केली त्याच पध्दतीने महाराष्ट्र सरकारने सुध्दा नुकसान ग्रस्त शेतकर्यांना ५० हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री (Anil Deshmukh) अनिल देशमुख यांनी केली.
ते शनिवारी यवतामळ जिल्हातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलत होते. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेताच तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकर्यांची कर्जमाफी केली होती. परंतु आता जे सरकार आहे ते लबाडाचे सरकार आहे. आपल्या भागात एक म्हण आहे’ लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही’. तशीच परिस्थीत या सरकारची झाली आहे असे देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला (Anil Deshmukh) अनिल देशमुख राजू भैय्या जयस्वाल वर्षा निकम अशोक राऊत संकेतअशोक राऊत, स्वप्निल कनवाळे नलिनी ठाकरे हजर होते.




 
			

