हिंगोली(Hingoli) :- नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी हिंगोली जिल्हा वार्षीक क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली मार्फत आयोजीत वार्षीक क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ३ जानेवारी रोजी करण्यात आली. हिंगोली नगरपरिषदेच्या (Municipal councils) हॉल मध्ये सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त पुष्पहार मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांचे हस्ते रिबीन कापुन व नारळ फोडुन या स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवशी कॅरम, बुध्दीबळ स्पर्धा व रांगोळी प्रतीयोगीताचे आयोजन करण्यात आले होते.
वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन
यात रांगोळी स्पर्धेत श्रीमती किरण रामदास लोलेवार, लेखापाल, नगरपंचायत औंढा (ना.) स्नेहल आवटे, स्थापत्य अभियंता, नगरपरिषद, हिंगोली, श्रीमती चित्रा वर्मा, नगरपरिषद, हिंगोली श्रीमती सुमन बनसोडे, नगरपरिषद्, हिंगोली श्रीमती प्रणिता दोडल नगरपरिषद, कळमनुरी श्रीमती राधा काळे, नंगरपंचायत औंढा (ना.) श्रीमती मंजुषा राठोड, नंगरपंचायत औंढा (ना.) यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेच्या सौ. विद्या पवार यांनी रांगोळीची तपासणी करून प्रथम क्रमांक श्रीमती किरण रामदास लोलेवार, व्दितीय क्रमांक स्नेहल आवटे व तृतिय क्रमांक श्रीमती सुमन बनसोडे यांना प्राप्त झाला. बुध्दीबळ स्पर्धेत एकुण १० स्पर्धकांनी भाग घेतला प्रथम क्रमांक अक्षय तांडेल, नगरपरिषद, हिंगोली व्दितीय क्रमांक महादेव बळवंते, नगरपरिषद वसमत व तृत्तीय क्रमांक किशोर काकडे, नगरपरिषद, हिंगोली या स्पधेचा निकाल अभय अन्नपुरे व अक्षत विरकुंवर यांनी काढले. कॅरम स्पर्धेत एकुण २८ जनांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धत प्रथम क्रमांक मो. मकदूम मो. शब्बीर, दिपक नरनवरे नगरपरिषद, कळमुनरी व्दितीय क्रमांक, विजय रामेश्वरे, दिनेश वर्मा, नगरपरिषद, हिंगोली व तृत्तीय क्रमांक, गजानन इंगळे, महादेव शिंदे नगर परिषद, कळमुनरी या वेळी मोहमद वाजीद मो. खुर्शीद यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला कॅरम संपर्क अधिकारी म्हणुन उपमुख्याधिकारी शाम माळवटकर, बुध्दीबळ स्पर्धेसाठी उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, रांगोळी स्पर्धेकरीता स्वाती श्रेत्रीय यांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व स्पर्धेचे प्रमुख जिल्हा समन्वयक म्हणुन अरविंद मुंढे मुख्याधिकारी नगरपरिषद, हिंगोली समन्वयक सहाय्यक रघुनाथ बांगर, प्र. स्वच्छता निरीक्षक, नगरपरिषद, हिंगोली या स्पथेच्या वेळेस जिल्ह्यातील सर्व भाग घेतलेले खेळाडु उपस्थीत होते.