हिंगोली (Hingoli) :- बस प्रवासातून कळमनुरी दिवाणी न्यायालयाचे लिपिक येत असताना तिकिटाचा राहिलेला एक रुपया त्यांनी मागितल्याने चालक व वाहकाने त्यांना मारहाण (beating) केल्याची घटना बुधवारी घडली याबाबत पोलिसात दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
हिंगोली शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील उत्तम सखाराम लोंढे हे कळमनुरी शहरातील सोमानी पेट्रोल पंपा समोर वास्तव्यास असून कळमनुरी दिवाणी न्यायालयात कार्यरत आहेत. २६ मार्च रोजी कळमनुरी ते हिंगोली बसने प्रवास करीत असताना त्यांनी काढलेल्या तिकिटांमधील एक रुपया राहिल्याने सायंकाळी ६.२० च्या सुमारास हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी वाहकाला एक रुपयाची मागणी केली असता त्यांना शिवीगाळ (Abusing) करून मारहाण करण्यात आली तसेच त्यांना तुझी बघून घेतो अशी धमकीही दिली याप्रकरणी लोंढे यांनी हिंगोली शहर पोलिसात रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून वाहक एस. बी. घुगे व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मार्के हे करीत आहेत.