हिंगोली (Hingoli Crime branch) : जिल्ह्यात अनेक वयोवृध्दांना अॅटोत बसून त्यांच्या खिशातुन रक्कम लुबाडण्याच्या घटना यापुर्वी अनेक घडल्या.ज्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तपास चक्र फिरवुन टोळीला गजाआड केले.
वयोवृध्दांना अॅटोत लुटणार्या चोरट्यांचा शोध घेण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी (Hingoli Crime branch) स्थानिक गुुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यावरून गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे सलमान उर्फ फेरोज खॉन असलम खॉन पठाण रा. एम.आर.पाणी प्लॅट गल्ली तेहरा नगर नांदेड, आकाश विश्वास कुटे रा. सखुजी नगर नांदेड नाका हिंगोली, शेख नुसरत शेख रशिद रा. नया मुजामपेठ दुधडेअरी धनेगाव नांदेड, गणेश पिंराजी गायकवाड रा. परवारा नगर कॅनल रोड नांदेड ह.मु. भावसार चौक नांदेड यांना ताब्यात घेतले.
त्यांनी हिंगोली शहरातील पिपल्स बॅक, बसस्थानक, जवळापळशी अॅटो पाईट जवळ वृध्दांना लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन गुन्ह्यातील रक्कम व गुन्ह्यात वापरलेले एक अॅटो असा एकूण २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या चोरट्यांकडुन तिन गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली (Hingoli Crime branch) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, राजुसिंग ठाकुर, प्रेमदास चव्हाण, रविकुमार स्वामी, किशोर सावंत, विशाल खंडागळे यांच्या पथकाने केली आहे.