आसोला तर्फे औंढा येथील घटना
हिंगोली (Hingoli Crime) : औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथे गोळीबाराच्या घटनेनंतर वाहनाची जाळपोळ करून रोख रकमेसह दागिने चोरून नेल्याने हट्टा पोलिसात १७ जणांवर गुन्हा दाखल (Hingoli Crime) करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसोला येथे वादातून गोळीबाराची घटना १८ जुलैला घडली. त्यानंतर एका जमावाने घरावर दगडफेक केल्याने रमेश रूस्तूमराव नागरे हे जखमी झाले. (Hatta police) पोलिसांनी वेळीच धाव घेऊन घराला वेढा दिल्याने जमाव पांगला.
या प्रकरणात रमेश नागरे यांनी १९ जुलै रोजी हट्टा पोलिसात तक्रार दिली. ज्यामध्ये आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून अनाधिकृतपणे त्यांच्या राहत्या घरात घुसून तुझा मुलगा कुठे आहे असे विचारून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून इतर आरोपींनीही त्यांच्यासह साक्षीदारांना शिवीगाळ करून घरातील एसी, मोटार सायकलची तोडफोड व दोन ट्रॅक्टर जाळून नुकसान केल्यानंतर (Hingoli Crime) घरातील कपाट उघडून त्यातील नगदी २ लाख २५ हजार रूपये व साक्षीदाराच्या अंगावरील ९० हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यामुळे हट्टा (Hingoli Police) पोलिसात कृष्णा काशिनाथ ढोबळे, बबन जोगदंडचा मुलगा, बबन जोगदंडचा पुतण्या, नागेश तावडे, काशिनाथ ढोबळे, शिवा पडघन, नागेश केशव ढोबळे यासह इतर पाच ते दहा आरोपी रा.आसोला तर्फे औंढा यांच्यावर दाखल केला. पुढील तपास सपोनि माधव जिव्हारे हे करीत आहेत.