हिंगोली (Hingoli Development Plan) : जिल्ह्याच्या विकासाचा आराखड्यावर जिल्हाधिकारी राहूल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांच्याशी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या सदस्यांनी 24 जून रोजी संवाद साधला. यावेळेस (Hingoli Development Plan) हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ व हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने तयार करण्यात आलेली पुस्तिका जिल्हाधिकारी गुप्ता यांना देण्यात आली. त्यात सन 2050 पर्यंत या जिल्ह्यामध्ये विकासाच्या काय संधी आहेत.
याबाबतचा ऊहापोह करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच (Hingoli Development Plan) जिल्ह्यातील व्यापार, व्यवसायिक, उद्योग यांच्या समस्यांवर चर्चा करण्या आली. या वेळेस नंदकिशोर तोष्णीवाल, दिलीप चव्हाण, अनिल नैनवानी, प्रशांत सोनी, रविंद्र सोनी, सुमीत चौधरी, सुरेश अप्पा सराफ, राजेश बगडीया, सचिन लखोटीया, सुमीत नैनवानी, महेश मोकाटे, प्रकाश इंगोले, गजानन मगर इ. व्यापारी उपस्थित होते.