देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli : हिंगोलीच्या सुपुत्राने रचला नवा इतिहास; भारत सरकारतर्फे पुष्यमित्र जोशीची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli : हिंगोलीच्या सुपुत्राने रचला नवा इतिहास; भारत सरकारतर्फे पुष्यमित्र जोशीची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड
मराठवाडाहिंगोली

Hingoli : हिंगोलीच्या सुपुत्राने रचला नवा इतिहास; भारत सरकारतर्फे पुष्यमित्र जोशीची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड

web editorngp
Last updated: 2025/03/07 at 11:53 AM
By web editorngp Published March 7, 2025
Share

हिंगोली (Hingoli) :- जिल्ह्यातील तरुण संशोधक, उत्कृष्ट वक्ता आणि धोरण सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्यमित्र जोशीची भारत सरकारच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय(Ministry of Sports), भारत सरकार(Government of India)  यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातो. हिंगोलीच्या इतिहासात प्रथमच पुष्यमित्र जोशीच्या रूपात राष्ट्रीय पुरस्कार जिल्ह्यातील नागरिकाला प्राप्त होत आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण हिंगोलीत अभिमानाचे वातावरण आहे.

सारांश
या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण हिंगोलीत अभिमानाचे वातावरणजागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यानी स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केलेआंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व

या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण हिंगोलीत अभिमानाचे वातावरण

राष्ट्रीय युवा पुरस्कार देशातील युवकांसाठी सर्वोच्च सन्मान मानल्या जातो. देशात १५ ते २९ वर्ष वयोगटात विज्ञान, समाजसेवा, नवोपक्रम, नेतृत्व, संशोधन आणि धोरण आदी क्षेत्रांमध्ये असाधारण कार्य करणाऱ्या युवा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पुष्यमित्र जोशीचे विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरणीय धोरण, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक प्रशासनातील मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. पुष्यमित्र जोशी हा संशोधक, नवोपक्रमकर्ता, लेखक आणि धोरण सल्लागार म्हणून सुपरिचित आहे. त्याच्या विज्ञान आणि समाजसेवा यांचे एकत्रित संशोधनात्मक कार्य समाजपरिवर्तनासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या तीन संशोधनांना भारत सरकारकडून पेटंट मान्यता मिळाली आहे. त्यानी आपल्या संशोधनाद्वारे पेटंट प्राप्त डिस्पोजमित्र उपकरणात कोविड-१९ काळात वापरून झालेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावली. त्या काळातच सॅनिटायझरची बाजारात कमतरता निर्माण झालेली असताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यानी स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले. त्याचसोबत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांनी इम्युनो बूस्टर तयार करून हजारो लोकांना मोफत वाटप केले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यानी स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले

भारताच्या २३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे १० पेक्षा अधिक गंभीर आजार होतात. या समस्येवर उपाय म्हणून पुष्यमित्रनी अ‍ॅक्वामित्र हे पेटंटप्राप्त संशोधन विकसित केले आहे. हे संशोधन अतिशय कमी खर्चात आणि कोणत्याही उर्जेशिवाय पाण्यातील फ्लुराईड कमी करण्यास मदत करते, त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. पुष्यमित्र जोशीनी विज्ञान, पर्यावरण आणि जीवनशास्त्र यासंबंधी तीन शैक्षणिक पुस्तके लिहिली असून, ती विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातदेखील समाविष्ट आहेत. त्याचे २० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर जगभरातील विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवर त्याचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत. भारताच्या महान इतिहासाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यदेखील त्याने केले आहे.
त्यानी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ब्रिक्स संघटनेच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम कार्यसमूहात भारताचे प्रतिनिधित्व पुष्यमित्रने केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व

स्टार्टअप आणि सामाजिक प्रभाव यावर भर देणाऱ्या जागृती जी २० यात्रेमध्ये त्यानी ‘बिझ ज्ञान ट्री’ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्यानी नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले असून, त्याच्या संशोधनासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून ‘अविष्कार’ संशोधन फेलोशिपनेही सन्मानित करण्यात आले होते. त्यानी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज, स्वच्छ तंत्रज्ञान स्पर्धा आणि अविष्कार वैज्ञानिक संमेलन अशा अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. त्याची प्रतिष्ठित इंडियन सायन्स काँग्रेसच्या सायन्स कम्युनिकेटर म्हणून निवड करण्यात आली होती.
पुष्यमित्रच्या रूपात प्रथमच हिंगोलीच्या मातीतील युवकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि हिंगोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

You Might Also Like

Panchayat Committee: लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर!

Fraud of Theft: परभणी दुकानातील साहित्य जाळून केला चोरीचा बनाव!

Disability Fund Expenditure: परभणीत दिव्यांग निधी खर्च करण्यास टाळाटाळ; गटविकास अधिकार्‍यांना घेराव!

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

Panchayat Committee: नांदेड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर!

TAGGED: Government of India, Hingoli, Ministry of Sports, narendra modi, Prime Minister
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
IFS Jitendra Rawat
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

IFS Jitendra Rawat: भारतीय IFS अधिकाऱ्याने केली आत्महत्या; कारण जाणून व्हाल थक्क!

Deshonnati Digital Deshonnati Digital March 7, 2025
Hingoli milk production: जिल्ह्यात दूध उत्पादन व संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज
Pusad Municipal Council: डिव्हायडर बनले घाणीचे साम्राज्य; लाखो रुपये गेले वाया
PM Narendra Modi : भूस्खलनग्रस्त वायनाडला भेट देण्यासाठी ‘पंतप्रधान मोदी’ पोहोचले केरळला
Gadchiroli Development Scheme : फलोत्पादन विकास योजनेतून शेतकऱ्यांनी साधली प्रगती 
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Panchayat Committee
लातूरमराठवाडा

Panchayat Committee: लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर!

October 13, 2025
Fraud of Theft
परभणीमराठवाडा

Fraud of Theft: परभणी दुकानातील साहित्य जाळून केला चोरीचा बनाव!

October 13, 2025
Disability Fund Expenditure
मराठवाडापरभणी

Disability Fund Expenditure: परभणीत दिव्यांग निधी खर्च करण्यास टाळाटाळ; गटविकास अधिकार्‍यांना घेराव!

October 13, 2025
Zilla Parishad
नांदेडमराठवाडा

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?