हिंगोली (Hingoli Police) : पंधरा वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीच्या (Hingoli Police) स्थानिक गुन्हे शाखेच्य विशेष पथकाने मुसक्या आवळल्या असुन फरारी आरोपींना न्यायालयात शनिवारी हजर केले आहे. विशेष पथकातील (Hingoli Police) पोलीस अमलदारानी १४ पाहीजे व फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असुन त्यापैकी (Goregaon Police) गोरेगाव पोलिस ठाणे अंतर्गत फरारी आरोपी दत्तराव सदाशिवराव मोरे रा.खैरखेडा, ता.सेनगाव, ह.मु. रिसोड हा मागील १५ वर्षापासुन अटक चुकवीत होता. त्यास रिसोड येथुन ताब्यात घेवुन गोरेगाव येथे हजर केले.
विशेष पथकाने आवळल्या मुसक्या
तसेच बासंबा पोलिस (Basamba Police) ठाण्यातील पाहिजे असलेला आरोपी जांबु वकील आडे, रा. भटसावंगी तांडा हा मागील ११ वर्षापासुन अटक चुकवीत होता त्यास भटसावंगी तांडा येथुन मध्यरात्री ताब्यात घेवुन बासंबा येथे हजर केले. तसेच मे महिन्यात मध्ये एकुण १४ पाहिजे, फरारी आरोपी न्यायालयात हजर करून, रेकॉर्डवरून कमी करण्यात आले आहे. सदरची मोहीम ही यानंतर सुद्धा चालु राहणार आहे. सदरची कार्यवाही (Hingoli Police) पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक (Crime Branch) गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोंडबा मगरे, गजानन पोकळे, नितीन गोरे, महादु शिंदे यांच्या पथकाने केली आहे.