उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी सेनगाव तहसिलदारांना दिले पत्र
हिंगोली (Hingoli Talathi) : सेनगाव तहसील अंतर्गत तलाठी घरभाडे व भाडेभत्ता उचलून मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने त्याची चौकशी करून अहवाल सादर करावा व मुख्यालयी न राहणार्या तलाठ्यांचा घरभाडे भत्ता नियमानुसार कपात करावा, अशा सूचना उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी सेनगाव तहसीलदारांना दिल्या आहेत.
या (Hingoli Talathi) प्रकरणी उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी सेनगाव तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नमुद केले असुन सेनगाव तहसील कार्यालयातंर्गत असणारे तलाठी घरभाडे व भाडेभत्ता उचलून मुख्यालयी उपस्थित राहत नाहीत. तसेच सर्व तलाठी हे तालुका व शहराच्या ठिकाणी राहतात, त्यामुळे शेतकरी व नागरीकांची गैरसोय होते.
अशा तलाठ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या संदर्भात चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने सेनगाव तहसील कार्यालयातंर्गत मुख्यालयी न राहणार्या (Hingoli Talathi) तलाठ्यांचा घरभाडे भत्ता नियमानुसार कपात करून केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयास सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी घुटूकडे यांनी दिल्या आहेत.