कळमनुरी (Hingoli wet drought) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रवि शिंदे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी पासून कळमनुरी उपविभागीय कार्यालयासमोर हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ (Hingoli wet drought) जाहीर करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी सौ.प्रतीक्षा भुते आणि तहसीलदार जीवकुमार कांबळे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर लेखी आश्वासन दिल्यामुळे ॲड.रवि शिंदे यांनी दोन दिवसांपासून चालू असलेले अन्नत्याग आंदोलन आज दि.३ ऑक्टोबर २०२५ रोजी मागे घेतले.
तहसीलदार जीवकुमार कांबळे यांनी लेखी पत्र दिले की, हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ (Hingoli wet drought) जाहीर करणे, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, अतिवृष्टीमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ३० लाख रुपये आर्थिक मदत, पिक विमा बँक खात्यावर जमा करणे, विद्यार्थ्यांची फी माफ करून शिष्यवृत्ती देणे, बेरोजगार युवकांना ३० हजार रुपये बेरोजगार भत्ता देणे या मागण्यांचा शासनाकडे त्वरित पाठपुरावा केला जाईल आणि स्थानिक पातळीवरील सर्व महसूल मंडळांमध्ये शंभर टक्के अतिवृष्टी जाहीर करणार, शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान दिवाळीपूर्वी बँक खात्यावर जमा केले जाईल, शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा झाल्यानंतर पीक कर्ज म्हणून कपात केले जाणार नाही याबाबत बँक प्रशासनास सूचना देणार, श्रावणबाळ निराधार वयोवृध्द लाभधारकांचे अनुदान बँक खात्यात त्वरित जमा करणार, शेतकरी-शेतमजूरांचे स्वस्त धान्याचे वाटप त्वरित केले जाईल, शेतकऱ्यांना बँकेची केवायसी अट शिथिल करून पैसे त्वरित बॅंक खात्यावर जमा होण्यासाठी पाठपूरावा केला जाईल असे लेखी पत्र दिले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर विद्यार्थी युवक महिला शासकीय कर्मचारी अधिकारी लाडक्या बहिणी वृद्ध अपंग निराधार कष्टकरी यांच्या आर्थिक मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचे ॲड.रवि शिंदे यांनी यावेळी आंदोलन मागे घेताना सांगितले.
अन्नत्याग आंदोलन मागे घेते वेळी मार्केट कमिटी सभापती मारोतराव खांडेकर,माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, बंडू पाटील ,माजी प.स.सदस्य अशोकराव करे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आनंदराव कदम, गुलाब भोयर, गणेशराव गडदे, अवधूत निळकंठे, शेख बाबा, रमेश सानप, खाजाभाई बागवान, प्रा.गजानन थोरात असोलेकर,अन्वर पठाण, सुनील मस्के, बंडू कोरडे, सुदर्शन वायकोळे, राजू बाभळे, तुकाराम बाभळे, गणेशराव मस्के,उत्तम पोटे, लक्ष्मण पोटे,आयुबखान पठाण,विनायकराव माखणे,रविशंकर पतंगे ,संतोष मगर, किसनराव वाघमारे, नरसिंगराव देशमुख, प्रदीप शिंदे,सुनील पाईकराव, दिनाजी क्षीरसागर, पुंजाराव वाघमारे, रामचंद्र क्षीरसागर ,अतुल वाघमारे ,संतोष क्षीरसगर ,शुभम सापनार ,वसंता शेंबडे, रामराव कांबळे,मुंजाजी बर्गे ,प्रदीप बरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे पदाधिकारी,शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.