तोबा गर्दी, आंबेडकरांच्या यापूर्वी झालेल्या सर्व सभांचे रेकॉर्ड आजच्या सभेने मोडले
हिंगोली (Prakash Ambedkar) : ‘होय, बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनीच पाडली’ असे अभिमानाने सांगणार्या ठाकरेंच्या पक्षाला मुस्लिम कसे मतदान करू शकतात, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हिंगोलीत उपस्थित केला.
शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडल्याचा अभिमान असणार्या ठाकरेंना मत देण्याऐवजी मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे, असे आवाहन करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हजरत मोहंमद पैगंबरांसहीत शिख, जैन व बौद्ध धर्मांच्या देवी-देवतांच्या अपमानाबाबत कायदा करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने नेहमीच केली आहे. पैगंबरांचा विचार करून मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडावा, असे आवाहन (Prakash Ambedkar) त्यांनी केले.
शेतकर्याने पिकविलेले सोयाबीन पडक्या भावात खरेदी करून चढ्या भावात परदेशात विकणार्या दलालांसाठी सरकार काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दलित-मुस्लिम व ओबीसी समुदायाच्या हितांच्या रक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवायचे असेल तर वंचित बहुजनांचे प्रतिनिधी सभागृहात असायला हवे, असेही ते म्हणाले. रविवारी हिंगोलीत झालेल्या प्रकाश आंबेडकरांच्या सभेला यापूर्वी कधी नव्हते तेवढी प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली. सभेला हिंगोली विधानसभा मतदार संघातील प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) मानणार्या मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.