परभणी/गंगाखेड (Illegal Sand transport) : तालुक्यातील पिंप्री शिवारातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा पकडून अंदाजे 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गंगाखेड पोलिसांनी रविवार 4 मे रोजी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गंगाखेड तालुक्यातील पिंप्री शिवारातील गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना उपसा केलेल्या (Illegal Sand transport) वाळूची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस ठाण्यातील सपोनि आदित्य लोणीकर, सपोनि शिवाजी सिंगणवाड, पो. ह. सुरेश राऊत, पो.शि. प्रकाश गिराम, परसराम परचेवाड आदींनी शनिवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गंगाखेड ते झोला रस्त्यावर सापळा लावून वाळूने भरलेला हायवा क्रमांक एमएच 22 एएन 2718 थांबवून त्याची पाहणी करत चालक दिपक राम कासले वय 26 वर्ष रा. फुले नगर गंगाखेड यांच्याकडे वाळूच्या रॉयल्टी बाबत विचारणा केली असता चालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने पाच ब्रास वाळूने भरलेल्या हायवासह अंदाजे 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पो. शि. प्रकाश बालासाहेब गिराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवार 4 मे रोजी पहाटे चालक दिपक कासले व हायवा मालक या दोघांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास सपोनि शिवाजी सिंगणवाड हे करीत असुन गोदावरी नदी पात्रातून होत असलेला अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या मजुरांसह (Illegal Sand transport) वाळू भरून देणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी गोदावरी नदी काठच्या गावातील ग्रामस्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.