रिसोड (Rohit Pawar) : वरुणराज फ्युल अॅन्ड एनर्जी (भारत पेट्रोलियम) चा शुभारंभ गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५ या शुभमुहूर्तावर बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ तथा आमदार रोहितदादा पवार (Rohit Pawar) यांच्या शुभ हस्ते आयोजित केला आहे.
वरुणराज फ्युल अॅन्ड एनर्जी (भारत पेट्रोलियम) उद्घाटनाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. खा. संजयरावजी देशमुख (खासदार यवतमाळ वाशिम लोक सभा) आ. किरणरावजी सरनाईक (आमदार विधान परिषद) दिलीपरावजी सरनाईक (प्रदेश सरचिटणीस काँग्रेस कमिटी महाराष्ट्र) मा. रविकांतजी वरपे (युवा कार्यध्याक्ष रॉ. कॉ. शरदचंद्र पवार) आ. अमितजी झनक (आमदार रिसोड विधानसभा) मा. आ. सुनिलजी भुसारा (प्रदेश उपाध्यक्ष रा. काँ शरदचंद्र पवार) बाबारावजी खडसे (जिल्हा अध्यक्ष रा.कॉ. शरदचंद्र पवार) मा. पंकज नाना बोराडे (युवा नेते रा. काँ. शरदचंद्र पवार) प्रमुख उपस्थित राहणार आहे .वरुणराज फ्युल अॅन्ड एनर्जी (भारत पेट्रोलियम) चा शुभारंभ गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५ ला रिसोड मेहकर रोड, रिसोड सायंकाळी ७ वाजताहोणार या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून अंकीत शुक्ला (T.M.BPCL Akola) निरजकुमार झा (D.M. BPCL. Akola) खुशाल (Sales Offi. Retail) गौरव बढे (Asst. Manager Engg.) हे राहणार आहेत.
वरुणराज फ्युल अॅन्ड एनर्जी या बीपीसीएल (BPCL) पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये सुरक्षित पेमेंट, उच्च दर्जाचे इंधन, अत्याधुनिक सुविधा, आणि ग्राहकांना उत्तम सुविधा असणार आहेत. तसेच मोफत हवा भरण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, आणि प्रथमोपचार पेटी यांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती वरुण (राम) सुधाकर देशमुख व समस्त देशमुख परिवार मोठेगांव/रिसोड यांनी केली आहे