दिग्रस (Yawatmal) :- तालुक्यातील डेहणी येथील शेत शिवारात वानराचा पाठलाग करताना बिबट्या (Leopard) सह वानर विहिरीत पडल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. वानराचा विहिरीत मृत्यू झाला. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने पाच तासानंतर बिबट्या जेरबंद केले.
वानराचा पाठलाग करतांना बिबट्या व वानर विहिरीत पडले
गेल्या अनेक दिवसांपासून दिग्रस तालुक्यात बिबट्या असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या त्या चर्चा खर्या ठरल्या असुन वानराची शिकार करतांना बिबट्या व वानर विहिरीत पडल्याची घटना घडली आहे वन विभागाची (Forest Department) टीमने विहिरीत पिंजरा सोडला परंतु बिबट्या सध्यातरी पिंजर्यात आला नाही. आज दि १५ मे रोजी डेहणी ता. दिग्रस येथील रामु रामजी चव्हाण यांच्या शेतात अचानकपणे बिबट्या वाणराचा पाठलाग करतांना शेतकर्यांच्या दृष्टीस पडला बिबट्याने वानरावर झेप घेवुन पकडले सुद्धा परंतु शेतात असलेल्या विहिरीत बिबट्या व वानर कोसळले लागलीच वन विभागास माहीती दिल्यानंतर शेख मुखबिर पप्पूवाले यांच्या नेतृत्वात रेस्क्यू टीमने विहिरीत पिंजरा सोडला परंतु सायंकाळी ५ वाजेपर्यंत बिबट्या पिंजर्यात आला नाही. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी डेरा टाकुन आहेत बिबट्या कधी पिंजर्यात येईल व बिबट्या अलगद बाहेर काढून जेरबंद करण्यात वनविभाग यश आले.