चंद्रपूर (Chandrapur) :- मोदी सरकारचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीला जाईल. ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘संकल्प से सिध्दी’ या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल.हा ११ वर्षांचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांना साथीला घेत केला आहे. भारताच्या उज्वल भविष्याची पायाभरणी या काळात करण्यात आली आहे. ११ वर्षाच्या कामगिरीची माहिती एका भाषणात देता येणे अवघड आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी साध्य झाल्या. मोदींनी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर, विकासाला गती मिळते हे सिद्ध केले.
मोदींनी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर, विकासाला गती मिळते
भाजपा सरकार जेथे जेथे आहे, तेथे तेथे गरीबांचा विकास झाला आहे.सुशासन ही देशाची संस्कृती बनली आहे. गेल्या ११ वर्षात भारताने अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.अशी माहीती आ.सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एन डी हॉटेल येथे भाजपा चंद्रपूर जिल्हा तर्फे आयोजित पत्रपरिषदेत सोमवार १६ जून रोजी दिली. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, राजेंद्र गांधी, आ.देवराव भोंगळे, डॉ मंगेश गुलवाडे व राहुल पावडे यांची उपस्थिती होती. आ. मुनगंटीवार म्हणाले, मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्दप्रयोग प्रत्यक्षात आणला आहे.आपण जनतेला जबाबदार आहोत, हे लक्षात ठेऊन मोदी सरकारने कारभार केला आहे. सरकारी कारभारात पारदर्शकता आणून, वेगवेगळ्या सुधारणा मोदी सरकारने केल्या. २०१४ पूर्वी देश भ्रष्टाचाराने पोखरला होता. देशात अनेक घोटाळे घडत होते. मोदी सरकारने मात्र देशात विकासाचे युग सुरू केले.२०१४ पूर्वी सरकारी योजनांचे लाभ लाभार्थी जनतेपर्यंत पोहचत नसत. लाभार्थी जनतेला हे लाभ मिळविण्यासाठी मध्यस्थांकडे जावे लागे. मोदी सरकारने डीबीटी प्रणालीचा वापर करत सामान्य माणसाच्या थेट बँक खात्यात लाभ पोहचवण्याचे काम केले आहे.अशी माहिती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
जिल्ह्यातील विकास कामांबाबत मुनगंटीवारांचे नो कॉमेन्ट्स
चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी भाजपाचे ५ आमदार निवडून आले आहेत मात्र मागील १० वर्षाच्या तुलनेत आता चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विकासात्मक कामे मागे पडत चालली आहेत का या प्रश्नावर उत्तर देतांना सुधीर मुनगंटीवार यांनी नो कॉमेन््टस म्हणत त्यावर मौन बाळगणे पसंत केले मात्र आगामी महानगर पालिका, जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकांसाठी आम्ही सर्वजण एकत्र बसून तयारी करीत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये भाजपाच जिंकेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.