फसवणूक केल्या प्रकरणी एकावर परभणीच्या जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल…!
परभणी (Jintur Fraud case) : कर्जदारांकडू कर्जाची वसुली केलेली रक्कम बँकेत न भरता कर्मचार्याने ६६ हजार ९०८ रुपयांचा अपहार केला. फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित कर्मचार्यावर ९ जून रोजी परभणीच्या जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल बनसोडे यांनी खबर दिली आहे. जिंतूर येथे भारत फायनान्शीयल इन्क्युजन लि. ची शाखा आहे. (Jintur Fraud case) याद्वारे सुक्ष्म कर्ज पुरवठा करण्यात येतो. जिंतूर येथील शाखेत किरण प्रशांत प्रधान हा संगम मॅनेजर म्हणून कामाला होता. संबंधिताकडे शाखेत नवीन सदस्य जोडणे, कंपनीच्या सदस्यांना कर्ज वाटप करणे, वसुली झालेली रक्कम वेळोवेळी शाखेत जमा करणे असे काम होते.
या कर्मचार्याने ३१ जानेवारी २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये कर्जदाराकडून वसुली केलेली रक्कम बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेत जमा न करता अपहार केला. सदरची रक्कम स्वत:साठी वापरली. (Jintur Fraud case) एकूण ६६ हजार ९०८ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी किरण प्रशांत प्रधान याच्यावर ९ जुनला जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.