हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल
हिंगोली (Judge Residence Burglary) : शहरातील जिल्हा परिषद रस्त्यावर असलेल्या प्रथम श्रेणी न्यायालयातील न्याय दंडाधिकारी स्मृति पळसुले यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडली. यामध्ये १४ लाख रुपयाचे सोन्याचे व चांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेल्याने ३० ऑगस्टला हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील जिल्हा परिषद रस्त्यावर (Judge Residence Burglary) प्रथम श्रेणी न्यायालय कोर्ट तिसरे न्यायदंडाधिकारी श्रीमती स्मृति सागर पळसुले यांचे पारीजात बिल्डींग प्लॅट क्र. २ मध्ये न्यायाधिश निवासस्थान असुन त्या काही दिवसापासून सुट्टीवर असल्याने त्यांच्या घराला कुलूप लावले होते. घराला कुलूप असल्याचे पाहूण अज्ञात चोरट्यांनी २९ ऑगस्टला घराचा कुलूपासह कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सामानाची अस्ताव्यस्त केली.
यामध्ये चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा वाकवुन लॉकरचे लॉक तोडून ४८ हजार ४०० रुपयाचे दोन सोन्याचे कंकण, १ लाख ५२ हजार ९०० रुपयाचे २ सोन्याचे तोडे, १ लाख ४९ हजार ९१२ रुपयाचे सोन्याच्या ४ बांगड्या, ४१ हजार ९९० रुपयाचे १ सोन्याची बाळी, २ लाख ८७ हजार ५०० रुपयाच्या २ सोन्याच्या पाटल्या, १ लाख ८५ हजार ५०० रुपयाचा सोन्याचा राणी हार, २७ हजार रुपयाचे सोन्याचे नेक्लेस, ८७ हजार ५०० रुपयाची सोन्याची जोंधळी पोत, ६२ हजार रुपयाचे सोन्याचे ब्रासलेट, ६२ हजाराचे सोन्याचे लहान कडे, १५ हजार रुपयाचे सोन्याचे, ६ हजार रुपयाचा चांदीचा मेखला, ६९०० रुपयाचे चांदीचे वाळे, २४१० रुपयाचा चांदीचा चमचा, १ हजार रुपयाचे २ चांदीचे बेडण, १ हजार रुपयाचे चांदीचे मोत्याचे तोडे यासह सोन्याच्या अंगठ्या असा एकुण १४ लाख १ हजार ९०२ रुपयाचा ऐवज चोरीस गेल्याने ३० ऑगस्टला (Judge Residence Burglary) हिंगोली शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल महिपाळे हे करीत आहेत.