प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद यांना निवेदन!
रिसोड (Kailash Nagar) : प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37(1) अन्वये सुधारीत विकास योजनेत फेरबदल करून शहरातील शेत सर्वे नंबर मधील आरक्षाणाने बाधीत सर्वे नंबर 9 मधील 2.25 हेक्टर आर जागे पैकी काही जागा कैलास नगर मध्ये राहणा-या रहीवाश्या साठी देण्याची मागणी महाविकास आघाडी चे जिल्हा समन्वयक बाळासाहेब देशमुख (Balasaheb Deshmukh) यांच्यासह या वस्तीतील 51 रहीवाशांनी एका निवेदनातून केली आहे.
रिसोड नगरपरिषदेच्या (Risod Municipal Council) माध्यमातून वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली जाहीर सुचना दिनांक-9ऑक्टोंबर 2025 विषयाच्या संदर्भात आपल्या नोटीसच्या अनुषंगाने मौजे रिसोड येथील शेत स.नं.9 मधील आरक्षणाने बाधीत असलेले क्षेत्र 2.25 हे.आर जमिन शासकिय व निमशासकिय कार्यालयासाठी वापर क्षेत्रात समाविष्ट करणे बाबत आपण किरकोळ फेरबदलाची कार्यवाही सुरु केल्याचे दिसुन येते त्या बाबत बाळासाहेब देशमुख यांनी हरकत व सुचना नोंदवीली आहे.
विषयांकित जमिनीच्या काही भागावर कैलास नगर नावाची वस्ती असुन गेले अनेक दक्षके त्या ठिकाणी नागरीक घरे बांधुन राहत आहेत.शासनाची प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) सुरु आहे.त्यामध्ये सर्वांसाठी घरे हा संकल्प केला आहे.योजने मध्ये शासकिय जमिनीवरील अतिक्रमीत घरे नियमानुकुल करण्याची सुध्दा तरतुद आहे.एखाद ठिकाणी जर शासकिय जमिनीवर (Government Land) जर आरक्षण असेल व लोकांची घरे नियमीत करण्यासाठी ही बाब अडचणीची होत असेल तर अशी आरक्षणे वगळून सदर जागा रहीवासी क्षेत्रामधुन आरक्षीत करण्या बाबत व आशा प्रस्तावास मंजुरी देणे बाबत मा. संचालक नगर रचना, पुणे यांना शासनाने अधिकार प्रदान केलेले आहेत.आशा परिस्थितीत संपुर्ण जागा शासकिय निमशासकिय कार्यालयासाठी आरक्षीत करणे योग्य होणार नाही. ही बाब येथे राहणा-या नागरीकांवर अन्याय करणारी ठरेल त्यामुळे अनेक नागरीक घरापासुन वंचित राहतील त्यामुळे कैलास नगर येथे रहीवाशां साठी विषयांकित प्रस्तावात ते राहत असलेली घरांखाली क्षेत्र रहीवासी प्रयोजनासाठी आरक्षीत करण्यात यावी हि आशा प्रकारची निवेनातुन नगरपरिषद कडे बाळासाहेब देशमुख यांनी केली आहे.
Kailash Nagar: शहरातील कैलास नगर मधील आरक्षीत जागा घरकुलासाठी देण्याची मागणी: बाळासाहेब देशमुख




