शिवसेना उबाठा इच्छुक उमेदवारांची पत्रकार परिषदेत माहिती
कळमनुरी (Kalamanuri Assembly Election) : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून पाच उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून यापैकी काहीजण जर उमेदवारी न मिळाली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत असतानाच पाचही इच्छुक उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तर आम्ही सर्व एक दिलाने काम करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
कळमनुरी विधानसभेची (Kalamanuri Assembly Election) जागा ही महाविकास आघाडी मधून शिवसेना उबाठा गटाला सुटणार असून यामुळे माजी आमदार डॉ.संतोष टारफे,जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपु पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,अजित मगर डॉ.रमेश मस्के हे इच्छुक उमेदवार असून यामध्ये काही इच्छुक उमेदवारांपैकी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा मतदारसंघात होत असल्यामुळे पाचही इच्छुक उमेदवारांना मुंबई येथे बोलविण्यात आले होते हे सर्व इच्छुक उमेदवार मुंबई येथून आल्यानंतर त्यांनी कळमनुरी येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्व एक असून आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तर इतर कोणीही बंडखोरी न करता एका दिल्याने पक्षप्रमुखांनी दिलेला उमेदवाराचे काम करणार असल्याची ग्वाही दिली तसेच पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख यांनी सांगितले की कळमनुरी मतदार संघ हा नेहमीच ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीमागे राहिलेला मतदार संघ आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक लोकसभेचे निवडणुकीत हे सिद्ध झाले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, शहर प्रमुख संतोष सारडा, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल,बाळासाहेब पारवे आदींची उपस्थिती होती.