महाविकास आघाडीचा कळमनुरी पोलिस ठाण्यात ठिय्या
कळमनुरी/हिंगोली (Kalamanuri Assembly Elections) : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे यांच्या कार्यकर्त्याच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या व कार्यकर्त्यांस मारहाण करण्यात आली. त्यामुळे कळमनुरी पोलिस ठाण्यासमोर (Kalamanuri Assembly Elections) महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
विधानसभा निवडणूक (Kalamanuri Assembly Elections) जशी जवळ येत आहेत तशी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तापत असून कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे १३ नोव्हेंबर रोजी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे यांच्या कार्यकर्त्याच्या वाहनावर काही जणांनी दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या तसेच त्या कार्यकर्त्यास मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार डॉ.संतोष टारफे, माजी खासदार शिवाजी माने, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष अजय सावंत उर्फ गोपू पाटील, संदेश देशमुख, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, डॉ. संतोष बोंढारे, सखाराम उबाळे,डॉ.सतीश पाचपुते, प्रशांत बोडखे, भागवत चव्हाण, डॉ. रमेश मस्के पाटील, अब्दुल्ला पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते कळमनुरी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले.
त्यानंतर या पदाधिकार्यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पोलीस स्टेशन परिसरात प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. कळमनुरी तालुक्यातील वाकोडी सर्कल मध्ये आमदार संतोष बांगर यांचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असुन या गोष्टीचा विरोध केला म्हणुन डॉ.संतोष टारफे यांच्या कार्यकर्त्याची गाडी फोडण्यात आली असा आरोप (Kalamanuri Assembly Elections) शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात येत आहे. वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कळमनुरीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून स्वत: घटनास्थळी धाव घेतली. या दरम्यान अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील ह्या सुध्दा आल्या होत्या. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यावरून माजी खा. अॅड. शिवाजी माने यांची पोलिस अधिक्षकांसोबत शाब्दिक चकमक झाली. या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.