डिजिटल युगात आणखी एक पाऊल पुढे
कळमनुरी (Tribal Development Project) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरीने तंत्रज्ञानाच्या युगात आणखी एक पाऊल पुढे टाकत शासकीय आश्रमशाळांसाठी नव्या संकेतस्थळाची सुरुवात केली आहे. रविवार, दि. २१ सप्टेंबर रोजी आय.टी.डी.पी. कळमनुरीच्या संकेतस्थळ ITDPKalamnuri.in चे उद्घाटन प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी (Tribal Development Project) कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधिव्याख्याते, शिक्षक व इतर कर्मचारी यामध्ये सहभागी झाले. या वेळी संकेतस्थळाची निर्मिती करणाऱ्या Dream Webbies संस्थेच्या प्रतिनिधींनी सर्वांना संकेतस्थळ वापरण्याची माहिती दिली.
नव्या संकेतस्थळाद्वारे शासकीय आश्रमशाळांचा प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन (Tribal Development Project) होणार असून विद्यार्थ्यांना अॅडमिशन, बोनाफाईड, टी.सी., नोंदणी आदी सर्व सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा रेकॉर्ड व इतर नोंदी ऑनलाइन करता येणार आहेत. या संदर्भात प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे यांनी सांगितले की, “नव्या संकेतस्थळामुळे शाळांची सर्व प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर होणार आहे.”
या (Tribal Development Project) उपक्रमाला आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.अशोक ऊर्फ राजू उर्फ अण्णा उईके, तसेच मा. तिनाबाई बनसोडे, आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र घोसाळकर, प्रकल्प अधिकारी डॉ. बासरे यांचे प्रयत्न आणि Dream Webbies चे सहकार्य यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. या बद्दल प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रकल्प अधिकारी डॉ.सुनील बारसे यांनी अभिनंदन केले.