कन्हान (Dharmaraj Primary School) : कांद्री नगरपंचायत येथे १७ सदस्यीय प्रभाग पध्दतीचे आरक्षण सोडत पिठासीन अधिकारी तथा रामटेक उपविभागीय अधिकारी मा. प्रियेश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कांद्री नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन गाढवे, वरिष्ठ लेखापाल हरिश्चंद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
या आरक्षण सोडतीसाठी प्रथमच धर्मराज प्राथ मिक शाळा, कांद्री-कन्हान व (Dharmaraj Primary School) जिल्हा परिषद उच्च प्राथ मिक शाळा, कांद्री च्या विद्यार्थ्यांना मान मिळाला. या सोडतीत धर्मराज प्राथमिक शाळेतील कु सावी डांगरे, कु प्रियांशी हेडाऊ, कु इशिता खांदारे, प्रांशुल लोणकर, रौनक वंजारी यांनी तर जिल्हा परिषद शाळेतील हर्षल मेश्राम, अर्नव चिन्नुरकर, कु नव्या शिंगारकर यांनी सह भाग घेतला होता.
राजकीय पटलावर प्रथमच मान मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद झळक त होता. सर्व विद्यार्थ्यांचे पिठासीन अधिकारी व रामटे क उपविभागीय अधिकारी मा. प्रियेश महाजन व मुख्याधिकारी सचिन गाढवे यांनी कौतुक केले व निवडणुक इतिवृत्तात या विद्यार्थ्यांचे नाव समाविष्ट होईल असे सांगितले. यावेळी (Dharmaraj Primary School) विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक खिमेश बढिये, कु शारदा समरीत व कु अर्पणा बावन कुळे उपस्थित होते.