कारंजा/वाशिम (karanja Crime) : महसूल विभागाने (Revenue Department) अवैध वाळू वाहतूक व गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत 2 लाख 24 हजारांचा दंड ठोठावला. गुप्त माहितीच्या आधारे तलाठी अमोल वक्ते यांनी 30 मे रोजी रात्री 10 वाजता कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील वेदांत शाळेजवळ एका 407 वाहनाची तपासणी केली असता, त्यात अर्धा ब्रास रेती आढळून आली. या (karanja Crime) संदर्भात विचारणा केली असता, परवाना आढळून न आल्याने त्यांनी सदर वाहन (Tehsil Office) तहसील कार्यालयात आणून लावले. त्यानंतर तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सदर प्रकरणी वाहन मालकावर 1 लाख 16 हजार 500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तर कामरगाव शिवारात शुक्रवारी 7 मे रोजी सकाळी 6 वाजता एका अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर (Revenue Department) महसूल विभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई केली.
या (karanja Crime) वाहनातून मुरुमाची वाहतूक होत होती. सदर प्रकरणी (Tehsil Office) तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी वाहन मालकास 1 लाख 7 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. (Revenue Department) महसूल विभागाने अवैधगौण खनिज व वाळू वाहतूक प्रकरणी 2 लाख 24 हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात तलाठी अमोल वक्ते , मंडळ अधिकारी डी.जी. पवार, नितीन घाटे, चिकटे व मोघाडे यांनी केली. (Revenue Department) महसूल विभागाच्या या दंडात्मक कारवाईमुळे अवैध गौणखनिज व वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अवैध वाहतुकीस आळा बसण्यास मदत होणार आहे.